Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च ३०, २०१८

महाकालीच्या दर्शनाकरिता येणा-या भाविकांसाठी जोरगेवार सरसावले:यात्रेकरूंनी मानले आभार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
                 सध्या चंद्रपूर शहरात माता महाकालीच्या यात्रेची धुम चालू आहे. यात्रेकरिता बाहेर जिल्ह्यातून भक्त येतात पण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यात्रेकरूंना इथे अतिशय अल्पशी सोय महानगर पालीकेकडून करून देण्यात आली आहे. या माता महाकाली मंदिरा लगत ठिकाणी पवित्र असलेली झरपट नदी आहे. त्या नदीच्या पात्रामध्ये लाखो भाविक स्नान करून मातेच्या दर्शनाकरिता जातात. भाविक उघड्यावर स्नान करतात पण त्यांना तिथे पुरेशी अशी स्नानगृहाची व्यवस्था सुद्धा मनपाप्रशासनाकडून करून देण्यात आलेली नाही. काल शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर परिसर गाठून भाविकांशी संवाद करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व यात्रेकरूंची पाहणी केली असता झरपट नदीच्या पात्रामध्ये लाखो महिला भाविक उघड्यावर स्नान करत होते त्यांना मनपा प्रशासनाकडून स्नान गृह सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले नाही त्यासाठी जोरगेवार यांनी ताबडतोब त्या ठिकाणी महिलांसाठी तात्पुरते स्नानगृह उपलब्ध करून दिले. त्यासाठी यात्रेकरूंनी किशोर जोरगेवार यांचे आभार मानले.
              मातेच्या दर्शनाकरिता येणारे यात्रेकरू दुषित पाण्यामध्ये स्नान करतात ते पाणी सुद्धा मनपा कडून स्वच्छ करून देण्यात आले नाही. त्याचप्रमाणे यात्रेकरूंना शौचालयाची सुद्धा व्यवस्था करून देण्यात आलेली नाही उघड्यावर शौचास बसाव लागत आहे हे दुर्दैव आहे. दर्शनाकरिता येणा-या महिलांना आपली आब्रू उघड्यावर टाकून इथे राहावे लागत आहे. यात्रेसाठी येणा-या माता भगिनीच्या आब्रुचे सुद्धा रक्षण मनपा करु शकत नाही असे जोरगेवार म्हणाले . एकीकडे आपण चंद्रपूर शहराचा विकास होत आहे कुठलाही निधी जिल्ह्यासाठी कमी पडू देणार अस म्हणतो हे विकासाच एक दृश्य येथील महाकाली मातेच्या यात्रेसाठी येणा-या भाविकांना दिसत आहे. हागणदारी मुक्त मनपा कडून बोलल्या जाते त्याचप्रमाने शहरात ठिकठीकाणी स्वच्छतेचे फलक लावण्यात आले पण या नदीच्या पात्रामध्ये कच-याचे ढिगारे दिसत होते. त्या धीगा-याचे सुद्धा काही विल्हेवाट मनपा कडून करण्यात आले नाही असा आरोप जोरगेवारांकडून करण्यात आला .  .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.