Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी २०, २०१८

वर्षानुवर्षे शासनाच्या जागेवर राहणाऱ्याना लवकरच मालकी हक्काचे पट्टे मीळणार:सर्वेक्षणाचे आदेश

 उदयसिंह यादव यांचे प्रयत्न फळाला 
रामटेक तालुका प्रतिनिधी-
रामटेक तालुक्यातील अत्यंत महत्वाचे  असलेले  मनसर हे गाव राष्ट्रीय  महामार्गावर वसले आहे.या ग्रामपंचायत क्षेत्रांत शासकीय जागेवरर अनेक वर्षापासून  लोकांनी  आपली घरे बांधली आहेत.मात्र ही जागा झुडपी जगंल या सदराखली असल्याने अडचण होती. मात्र आता हया सर्व जमीनी महसूल विभागाच्या ताब्यात आहेत.या गावातील 60 टक्के लोक सुमारे चाळीस वर्षापासून  या जमीनीवर अतिकम्रण करून राहात आहेत.मात्र यांचेजवळ मालकी हक्काचा कठुलाही कागद वा पुरावा नाही त्यामुळे त्यांना सतत अढचणींचा सामना करावा लागत आहे.या सर्व जागचेे भूमी अभिलेख विभागाकडून सर्वेक्षण करून मालकी हक्काचा पट्टा व आखीव पत्रिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
     आदिवासी वनहक्क कायदा 2006 व शासकीय जमीनीवर झालेले अतिकम्रण नियमानुकूल करण्याचे महसूल व वनविभाग महाराष्ट्र  शासनाचा निर्णय क्रमांक एलईएम/10/2001/प्रक2्र25/ज-1 मंत्रालय  मुबई दिनांक 4/4/2002 अंतर्गत स्थानीक लाकेांना शासकीय नियमाप्रमाणे कार्यवाही करून मालकी हक्काचा पट्टा किंवा आखीव पत्रिका उपलब्ध करून देणेसाठी रामटेक पं.स.चे माजी उपसभापती उदयसिंह यादव यांनी चंद्रकांतदादा पाटील,विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी,नागपुर यांना निवेदन दिले हातेे.याबाबत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी,नागपुर यांनी रामटकेचे उपविभागीय अधिकारी यांना कारवाई करण्यासंदर्भात आदेशीत  केले होतेत्या अनुशगाणे  रामटेकचे उपविभागीय अधिकारी राम जोशी  यांनी दिनांक 16 फेब्रुवारी 2018 रोजी रामटेकचे तहसिलदार,वनपरीक्षेत्राधिकारी व उपअधिक्षक भुमीअभिलेख  ,रामटेक यांना सदर प्रकरणी सर्वेक्षण करावे असे आदेश  दिले आहेत. 
    उपरोक्त  आदेशाने अतिक्रमीत सर्व जागेचे सर्वेक्षण लवकरच होणार  असून या ठीकाणी वर्षानुवर्षे  आपले घर  बांधून  राहणर्या  अतिक्रमीतांना त्याच्ंया जागेचा पट्टा मीळण्याची कार्यवाही सरूु झाली असल्याचे उदयसिंह यादव यांनी सांगीतले.याप्रकरणी मनसर येथील  ग्राम.पं.सदस्य सब्बाराव नायडु,संतोष  बोरीकर,,कचंन धनोरे,व अन्य साबीर कादरी,माहेन भगत,राजकुमार गुप्ता,राजेष भोसले,बाबु खान,गब्बर शेख ,आषिश कळंबे यागेेश  गोस्वामी यांनी सातत्याने सरकारकडे मागणी कलेी होती. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.