Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी २३, २०१८

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ लिपिकास लाच घेतांना रंगेहात अटक

लाच साठी इमेज परिणामचंद्रपूर(ललित लांजेवार):
तक्रारदर हे जाक्कापूर   तालुका सीरपुर (टाउन) जिल्हा कुमरभिक आसीबाबाद,तेलंगाना राज्य येथील रहिवासी असून आदर्श शिक्षण प्रसारक  मंडळ राजुरा यांचे सिद्धार्थ तेलुगु  उच्च प्राथमिक शाळा राजुरा येथे शिक्षक  म्हणून काम करीत असताना जुलै २०१५  मध्ये  संस्थेने त्यांना कोणतेही  कारण न देता तोंडी आदेशाने सेवामुक्त केले.  तक्रारदार यांनी  माध्यमिक शाळा  न्यायाधिकरण मध्ये संस्थेविरुद्ध तक्रार दाखल केली. 
 केलेल्या तक्रारीचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लागला .मे २०१७ मध्ये तक्रारदार पुन्हा शाळेत रुजू झाल्यानंतर त्यांचे वेतन देयक मंजुरीकरिता अधीक्षक वेतन  पथक (प्राथमिक शिक्षण) विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे पाठविले असून  माध्यमिक शिक्षण उपसंचालक  यांनीही त्याचे 2017 पासूनचे बनते हे काढण्याचे आदेश  दिल्यानंतरही सदर वेतन देयक मंजूर करण्यासाठी तसेच पुढील वेतन सुरळीत चालू 
करण्यासाठी अधीक्षक  वेतन (प्राथमिक शिक्षण) विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे  कार्यालयातील वरिष्ठ लिपिक  विजय तिडके यांनी त्याकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी  केली.मात्र तक्रदाराला लाच देणे मंजूर नसल्याने तक्रारदाराने  लाचलुचपत प्रतिबंधकविभागाकडे तक्रार दिली.
या तक्रारीवरून २२ फेब्रुवारी २०१८  रोजी कार्यालय अधीक्षक वेतन पथक प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे केलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान  विजय तिडके  वरिष्ठ लिपिक यांनी तक्रार दाराकडे वेतन देयक मंजूर करून  देण्यासाठी तसेच पुढील  वेतन सुरळीत चालू करण्यासाठी तडजोडीअंती 15000 लाचेची मागणी  केल्याचे स्पष्ट  झाल्याने आज दिनांक 23  फेब्रुवारी २०१८ शुक्रवार रोजी लाचेचा सापळा रचला असता  साप ल्या  दरम्यान  विजय तिडके वरिष्ठ लिपिक व 42 वर्षे कार्यालय अधीक्षक वेतन  पथक प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी तक्रारदाराकडून १५००० हजार   लाच म्हणून स्वीकारतांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  त्यांना रंगेहात  पकडले.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील ला.प्र.वि. नागपूर,उपायुक्त तसेच पोलीस अधीक्षक विजय माहुलकर नागपूर, तसेच पोलीस उप अधीक्षक डी.एम. घुगे,  ला.प्र.वि.चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व , ना.पो.का संतोष येलपुलवार महेश मांढरे,अजय बागेसर ,भास्कर चिंचवलकर, मनोज पिदूरकर, समीक्षा भोंगडे,सिडाम  यांनी पार पडली .
जिल्हा परिषद चंद्रपूर साठी इमेज परिणाम


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.