Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी २३, २०१८

धापुदेवी भांगडिया यांचे निधन

नागपूर/प्रतिनिधी:
  प्रतिष्ठीत व्यावसायिक आणि समाजसेवी स्व. गोटूलालजी भांगडिया यांच्या पत्नी, चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे विधान परिषद सदस्य आमदार मितेशजी भांगडिया यांच्या आई आणि चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांची आजी धापुदेवी भांगडिया यांचे आज २३ फेब्रुवारीला वयाच्या ८१ व्या वर्षी उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचेवर गेल्या एक आठवड्यापासून नागपूर येथील वोकहार्ट हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. दोन दिवसापासून त्यांची प्रकृती सुधारत असतानाच काल त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि आज दुपारी 2 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा भांगडिया निवास, गेटवेल हॉस्पिटल जवळ, धंतोली, नागपूर येथून ५.१५ वा. निघणार असून मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.