Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी २३, २०१८

प्रधान सचिवांनी घेतला स्वच्छता सर्वेक्षण तयारीचा आढावा

नागपूर,ता.२३ : स्वच्छ सर्वेक्षण सुरू होत आहे. त्यासंबंधीच्या अंतिम आढावा घेण्यासाठी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी शुक्रवारी (ता.२३) ला नागपूर महानगरपालिका मुख्यालायाला भेट दिली.
यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे,आयुक्त अश्विन मुदगल, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्र शासनाद्वारे देशातील सर्व शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे. नागपुरात पुढील दोन दिवसात सर्वेक्षण सुरू होणार आहे. यासाठी मनपा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी घेतला. नागपूर शहराला मिळणाऱ्या गुणांची समीक्षा देखील यावेळी त्यांनी केली. नागरिकांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाबाबत जनजागृती होईल याकरिता शहरातील मुख्य ठिकाणी म्हणजे रेल्वे स्टेशन, बस स्थानक, पर्यटन स्थळे येथे होर्डिंग लावण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

शहरातील बाजारपेठांच्या ठिकाणीसुद्धा होर्डिंग लावण्यात यावे. इतवारी, गोकूळपेठ, बर्डी, सदर यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी मोठे होर्डिंग आणि बॅनर लावण्यात यावे, असे सूचित केले. गणेशपेठ येथील बस स्थानकाजवळ आणि रेल्वे स्टेशनजवळ स्वच्छतेचा अभाव आहे. तेथे स्थानिक अधिकारी व कर्मचारी नेमून स्वच्छता करण्यात यावी, असे निर्देशित केले. तेथील सेफ्टिक टँक साफ करण्यात यावी. परिवहन महामंडळाने यासाठी कंत्राटदार नेमला आहे. त्यासोबत समन्वय साधून स्वच्छ करण्याचे आदेश श्रीमती मनिषा म्हैसकर यांनी दिले.

कचरा विलगीकरणामध्ये सध्या नागपूर मागे आहे. त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू असल्याची जनजागृती जाहिरातीद्वारे, फेसबुक, ट्विटर, वॉटस्‌ ॲपद्वारे करण्यात यावी, जेणेकरून नागरिक स्वच्छ सर्वेक्षणाकरिता जागृत राहतील, असेही सूचित केले.कचरा टाकण्याचा परिसराचे रंगरंगोटी करून सौंदर्यीकरण करण्यात यावे, असे आदेश त्यांनी दिले.

यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या, स्वच्छ सर्वेक्षणात लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक आहे.प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागात स्वच्छ सर्वेक्षणाबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मनपाचे पदाधिकारी व अधिकारी दिवसरात्र मेहनत घेत असल्याचे सांगत शुभेच्छाही दिल्या.

प्रारंभी स्वच्छ सर्वेक्षणासंदर्भात नागपूर महानगरपालिकेने केलेल्या तयारीचे सादरीकरण आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले. त्यावर नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी समाधान व्यक्त केले.

बैठकीला अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, राजेश मोहिते, आरोग्य अधिकारी (स्वच्छता)डॉ.प्रदीप दासरवार, स्वास्थ निरिक्षक रोहिदास राठोड, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार,महानगरपालिकेच्या दहाही झोनचे सहायक आयुक्त आणि झोनल अधिकारी उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट

या भेटी दरम्यान मनिषा म्हैसकर यांनी अंबाझरी उद्यानाजवळ मनापद्नारे उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद स्मारक तसेच धरमपेठ मधील म्हाडा कॉलनीजवळ रोटरी क्लबच्या साहाय्याने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत आयुक्त अश्विन मुदगल, नगर विकास विभागाचे सहसचिव श्री.बोबडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, धरमपेठ झोनचे सहायक आय़ुक्त महेश मोरोणे, आरोग्य अधिकारी(स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, पशूचिकिस्तक डॉ.गजेंद्र महल्ले, स्वास्थ निरिक्षक रोहिदास राठोड उपस्थित होते. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.