भाजपने 2 कोटी युवकांना रोजगार देऊ, असे आश्वासन निवडणुकीदरम्यान दिले होते. मात्र, अद्यापही रोजगार उपलब्ध झालाच नाही. त्याचे पडसाद चंद्रपूरमध्ये देखील बघायला मिळाले .भाजप सरकार विरोधात नाराजी व्यक्त करत चंद्रपुरातील तुकूम परिसरात शेकडो उच्चशिक्षित युवक-युवतीनी सरकारच्या विरोधात थेट रस्त्यावरच ठेला उभा करत अनेक उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी पकोडे तडून नाराजी व्यक्त केली.
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान 2 कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा भाजपने केली होती. या घोषणेचे काय झाले असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला होता.पंतप्रधानांनी पकोडा विकून कुणी 200 रुपये रोज कमावत असेल, तर तो चांगला व्यवसाय असल्याचे मत व्यक्त केले होते. तसेच पकोडे विकणे हा एक मोठा रोजगार असल्याचे म्हटले होते. आमच्या पालकांनी आर्थिक ताण सहन करत आम्हाला पदवीपर्यंतचे शिक्षण दिले आहे. ते यासाठीच का? पंतप्रधानांनी चहा विकून स्वत:चा उदरनिर्वाह केला. तीच स्वप्न ते देशातीले उच्च शिक्षित तरुणांना दाखवित तर नाही ना? असे प्रश्न यावेळी आंदोलक तरुणांनी उपस्थित केले. तसेच अद्यापही रोजगार उपलब्ध होत नसल्याने सरकारचा निषेध केला.
उच्चशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना रोजगार नसल्याने सरकारने त्यांच्यावर पकोडे विकण्याची वेळ आल्याची टीका शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक सुरेश पचारे यांचे सोबत शेकडो उच्चशिक्षित युवक-युवती उपस्थित होते.