विदर्भातील सर्वात मोठा त्रिशूल
भद्रावती/प्रतीनिधी: वरोरा येथील नमो फेब्रिकेशनचे मालक मनोज समर्थ यांनी 40 फूट लांब असलेला त्रिशूल बनविला आहे. त्रिशूलाचे वजन लगबग 800 किलो असून हा त्रिशूल बनविण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागला असून साधारण एक लाख रुपयांचा खर्च लागला. ६० ते ७० शिवभक्तांनी त्रिशूल उचलून पारंपरिक पद्धतीने महादेवाचा पोहा म्हणत त्रिशूलाची मिरवनूक काढण्यात आली. सतीश पिंपळकर रहाणार भद्रावती या शिवभक्तांनी हा त्रिशूल तयार करण्यासाठी वरोरा येथे नमो फेब्रिकेशन वरोरा येथे हे काम दिलेले होते. हा त्रिशूल ट्रॅक्टर द्वारे भद्रावती येथे नेण्यात आला. येणाऱ्या १३/२/२०१८ ला शिवरात्रीच्या दिवशी हा त्रिशूल झाडे प्लाट, लंगडा मारुती येथे विधिवत पूजा अर्चना करून उभारण्यात येणार आहे. यावर्षीचा हा विदर्भातील सगळ्यात वजनी आणि लांब त्रिशूल असून शिवभक्तांमध्ये याची सर्वत्र चर्चा आहे.