Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी ११, २०१८

एमआरआय मशीनसाठी ७.५ कोटी-ना.मुनगंटीवारांचा पुढाकार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था शिर्डी यांचेकडून चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात एमआरआय मशीन खरेदीसाठी ७.५ कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. विधी व न्याय विभागाच्या दिनांक २३ नोव्हेंबर २0१७ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था शिर्डी यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रूग्णालय चंद्रपूर यांना एमआरआय मशीन खरेदीसाठी दिनांक २७ डिसेंबर २0१७ रोजीच्या पत्रान्वये मंजुरी दिली आहे. 
चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात एमआरआय मशीन अभावी रूग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर रूग्णालयात एमआरआय मशीन खरेदीसाठी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था शिर्डी यांना विनंती केली व याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याच्या फलस्वरूप श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था शिर्डी यांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयाला एमआरआय मशीन खरेदीसाठी ७.५कोटी रू. निधी मंजूर केला आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. सुमारे ५00 हून अधिक दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलींचे वितरण, ३५ हजार नागरिकांना चश्मे वितरण, ५ हजार नेत्ररूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यासह नुकतीच लाईफ लाईन एक्सप्रेस या उपक्रमाच्या माध्यमातुन रोगनिदान, उपचार व नि:शुल्क शस्त्रक्रिया त्यांनी करविल्या. चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय त्यांच्या प्रयत्नांनी सुरू झाले. सामान्य रूग्णालयासाठी नुकताच ९ कोटी रू. निधी त्यांनी मंजूर करविला. शिर्डी संस्थांन च्या माध्यमातुन एमआरआय मशीनसाठी ८ कोटी रू. निधी त्यांनी मंजूर करविला. पोंभुर्णा येथे ग्रामीण रूग्णालय मंजूर करविले. चंद्रपूर जिल्हयातील घुग्गुस, पडोली, बेंबाळ, चिचपल्ली, मुल, दुगार्पूर, धाबा, विसापूर, पोंभुर्णा, साखरवाही, नांदगांव पोडे, बल्लारपूर याठिकाणी रूग्णवाहीका त्यांनी उपलब्ध केल्या. मुल येथे एनआरएचएम च्या सहाय्याने आरोग्य महामेळावा त्यांनी आयोजित केला व त्या माध्यमातुन मोठया संख्येने नागरिकांवर उपचार व शस्त्रक्रिया त्यांनी करविल्या. कॅन्सर, मुखरोग, दंतरोग व तत्सम आजारांबाबत शस्त्रक्रिया शिबीरांचे आयोजन त्यांनी केले. टाटा ट्रस्टच्या सहाय्याने चंद्रपूर जिल्हयात कॅन्सर रूग्णालय उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय नुकत्याच त्यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे. हे कॅन्सर रूग्णालय वर्षभरात उभारण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात एमआरआय मशीन अभावी होणारी रूग्णांची गैरसोय लक्षात घेता यासाठी मंजूर झालेला ७.५ कोटी रू. निधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर झाला असुन लवकरच चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात ही मशीन स्थापित होणार आहे. आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी यांनी घेतलेल्या पुढाकाराच्या अनुषंगाने झालेल्या महत्वपूर्ण निर्णयांच्या मालिकेत हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण मानला जात आहे. 

इमेज परिणाम

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.