Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी ११, २०१८

मसाळा तुकूमच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली


प्रतिनिधी / चंद्रपूर                   
चंद्रपूर क्षेत्रिय वेकोलि विभागातील भटाळी विस्तारीकरण खदान व दुगार्पूर डीप एक्सटेन्शन या दोन्ही खदानीतील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना ना. अहीर यांच्या प्रयत्नामुळे अनुक्रमे ९0 कोटी व ५२ कोटी रूपए वितरीत केल्या गेले. तसेच भटाळी प्रकल्पातील ४१0 पैकी बऽयाच नोकर्‍या सुध्दा देण्यात आल्या. विशेषत: दुगार्पूर डीप एक्सटेन्शन या प्रकल्पात ना. अहीर यांनी विशेष प्रयत्न करून नुकतीच २७४ नोकऽयांना वेकोलि मुख्यालयातून अंतिम मान्यता मिळवून दिल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या नोकरीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे. चंद्रपूर वेकोलि क्षेत्रातील हे दोन्ही प्रकल्प कॉस्ट प्लस असतांना ना. अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून व उजार्मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी दोन्ही प्रकल्पाचा महाजेनकोसोबत करार करून प्रकल्प मार्गी लावले. दि. ३0 डिसेंबर २0१७ रोजी बैठकीत वेकोलि सीएमडी श्री आर.आर. मिर्श यांच्या सोबत मसाळा तुकूम या गावच्या पुनर्वसनासंबंधी प्रश्न उपस्थित करून तो अंतिमरित्या मा. मंत्री महोदयांनी निकाली काढला.
दुगार्पूर डीप एक्सटेन्शन या प्रकल्पासोबतच पूर्वी वेकोलि प्रबंधनाने नवेगांव, सिनाळा, मसाळा (जुना) व मसाळा तुकूम या चारही गावाचे पुनर्वसन मान्य केले होते. परंतु काही कालावधीनंतर केवळ तीन गावाचेच पुनर्वसन प्रक्रीया सुरू केली व गावातील घरांचे सर्व्हेक्षण सुध्दा केले. या सर्व घडामोडीत मसाळा तुकूम या गावाचे पुनर्वसन वेकोलिद्वारे बाजुला सारल्या गेले होते.
मागील वर्षभरापासून ना. अहीर यांनी या गावाचे पुनर्वसनामध्ये समावेश व्हावा म्हणून चंद्रपूर क्षेत्रिय कार्यालय तसेच वेकोलि मुख्यालयात सुध्दा बैठकी घेतल्या व मसाळा तुकूम या गावातील गावकर्‍यांवर अन्याय होणार नाही अशी खंबीर भूमिका घेवून त्यांना या गावाच्या पुनर्वसनासोबतच पुनर्वसन करू असे भरीव आश्‍वासन दिले होते. ना. अहीर यांच्या अथक प्रयत्न आणि पर्शिमातून वेकोलि प्रबंधनाने मसाळा तुकूम या गावाचे पुनर्वसन उर्वरीत तीन्ही गावासोबतच करू असा निर्णय घेत प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये त्याचा समावेश सुध्दा केला असल्यामुळे आता येणाऽया काळात या मसाळा तुकूम गावाचा बेसलाईन सर्व्हे सर्व्हेक्षण सुरू होईल व मसाळा तुकूम गावाचा पुनर्वसनाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे. मसाळा तुकूम या गावातील जमीनीचे अधिग्रहण वेकोलिद्वारे अगोदरच केल्या गेले होते व या गावाच्या सीमेलगत वेकोलिचे मातीचे ढिगारे व जंगलसदृष्य स्थिती निर्माण झाल्यामुळे जंगली जनावरांचा हल्लासुध्दा मागच्या वर्षी गावात झाल्यामुळे गावकर्‍यांनी ना. अहीर यांच्याकडे जोरकसपणे पुनर्वसनाची मागणी रेटून धरली होती. दिलेल्या शब्दानुसार त्यांना अखेर न्याय मिळवून दिला.
मसाळा तुकूम या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल मसाळावासीयांमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. ना. अहीर यांचे गावकर्‍यांनी व स्थानिक भाजपा पदाधिकार्‍यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले. मसाळा तुकूम येथील गावकर्‍यांनी ना. अहीर यांच्या निवासस्थानी भेट देवून अभिनंदन केले. याप्रसंगी जिल्हा महामंत्री राहुल सराफ, उपसरपंच सिनाळा बंडू रायपुरे, उपाध्यक्ष युवा मोर्चा सिध्दार्थ रायपुरे, पदमापूर उपसरपंच गिरजाबाई दुर्योधन, राजू र%पारखी, अनिल दुर्योधन, वसंता दुर्योधन, सदाशिव खोब्रागडे, बाबानंद सोनटक्के, धनराज पेटकर, बाळु खोब्रागडे, बंडू सोनटक्के, सिकंदर दुर्योधन, भोला खोब्रागडे, किशोर दुर्योधन, कालीदास दुर्योधन, माधव दुर्योधन, सौ. ज्योती खोब्रागडे, सौ. स्मीता दुर्योधन, सौ. रेखा दुर्योधन, सौ. रेखा किशोर दुर्योधन, कोपुलवार, मानिक निमगडे, ताराचंद निमगडे व इतर प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला.
               


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.