Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी ११, २०१८

पेट्रोल पंपावर चाकूने हल्ला

नागपूर : चाकूने हल्ला करून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून रोकड हिसकावून घेण्याचा प्रयत्न नागपुरातील नरेंद्रनगरात असलेल्या एका पेट्रोलपंपवर बुधवारी रात्री झाला. या घटनेत पंपावरील एक कर्मचारी जबर जखमी झाला असून परिसरात दहशत निर्माण झाली होती.
नरेंद्रनगर पुलाच्या बाजुला वैष्णवी पेट्रोल पंप आहे. या भागात वर्दळीच्या मार्गावर हा एकमात्र पेट्रोल पंप असल्यामुळे तेथे रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी असते. बुधवारी रात्री ९.५० वाजता वाहनचालकांना तेथील कर्मचारी पेट्रोल देत असताना दोन आरोपी आले. येथील कर्मचारी नितीन रमेश चिचघरे याला चाकू दाखवून त्यांनी त्याच्याजवळची रोकड असलेली बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. नितीनने प्रतिकार करताच त्याच्या मानेखाली आरोपींनी चाकू मारला. गंभीर जखमी झालेला नितीन कॅबिनकडे पळून गेल्याने आरोपींनी दुसरा कर्मचारी शुभम शंकर जिवनापूरकर (वय २२) याच्याकडे धाव घेतली. मात्र नितीनच्या रक्ताने भरलेला चाकू बघून लुटारू आणि त्याचे सहकारी कर्मचारी घाबरले आणि त्यांनीही पळ काढला. तत्पूर्वीच पंपावर पेट्रोल भरायला आलेले वाहनचालकही तेथून पळून गेले होते. वर्दळीच्या मार्गावर हा गुन्हा केल्यानंतर जास्त वेळ थांबणे धोकादायक असल्याचे लक्षात आल्याने आरोपी तिसऱ्या एका साथीदाराच्या मोटरसायकलवर बसून पळून गेले. दरम्यान, जखमी नितीनला त्याच्या सहकाऱ्यांनी डॉक्टरकडे नेऊन अजनी पोलिसांना या घटनेची माहिती कळविली. त्यानंतर अजनी पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. एपीआय पुरी, पीएसआय वाय. व्ही. इंगळे यांनी आरोपींबाबत विचारणा केली. मात्र, त्यांची ओळख पटविणारा धागा पोलिसांच्या हाती लागला नाही.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.