चंद्रपूर : येथील जिल्हा स्टेडियमवर जिल्हा महिला व बालविकास विभागाअंतर्गत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय बालोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा कारागृह अधीक्षक श्री. ढोले उपस्थित होते. सुरवातीला महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांनी बालोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. मुख्य कार्यपालन अधिकारी श्री. पापळकर यांनी जिल्ह्यातील बालगृहातील लाभार्थ्यांना तसेच सहभाग घेतलेल्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून दिले. सर्वांनी कोणत्या ना कोणत्या खेळात सहभाग घ्यावा असे आवाहन करीत, स्पर्धा जिंकून प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस मिळाले, त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी आशितोष सलील यांनी विविध खेळांत सहभाग घेण्याकरिता आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संचालन उज्वला पोईनकर यांनी केले, तर आभार जिल्हा परिविक्षा अधिकारी रमेश दडमल यांनी मानले.