Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी ०३, २०१८

सरकारी जागेत केले रस्ता बांधकाम

सरपंच योगीता गायकवाड यांचेवर भ्रष्टाचार आरोप

रामटेक /तालुका प्रतिनिधी-ग्रामपंचायत सितलवाडी(परसोडा) च्या सरपंच कु.योगिता गायकवाड यांनी खाजगी भुखंड मालकास लाभ पोहचविण्याच्या हेतूने जिल्हा परिषदेच्या च्या मालकीच्या जागेतून रस्ता बांधकाम करून गैरप्रकार केल्याचा आरोप या ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद चंद्रभान सावरकर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी व सितलवाडी येथील नागरीक बलवंतराव माकोडे यांनी नागपुरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना लेखी तक्रार केली आहे.
रामटेक तालुक्यांतील सितलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील,मौजा सितलवाडी प.ह.नंबर 38 येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जनपद कार्यकाळातील शासकीय जागा सर्व्हे नंबर 86,एकूण अराजी 2.74 हेक्टर आर असून ही जागा जनपद सभा कार्यालय व रामटेक विकास सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्था ,रामटेक यांचे नावे सातबारावर नमूद आहे.ही जागा रामटेक -मनसर या महामार्गालगत आहे.या जागेला लागुण मागच्या बाजुला शेतजमीनी विकत घेऊन काही ले-आउट पाडण्यांत आले आहेत .मात्र रामटेक -मनसर या मुख्य मार्गाला पोचमार्ग नसल्याने या ले-आउटमधील भूखंड मागील सुमारे 15 वर्षा पासून विकले जात नव्हते.
सन 2003 ते 2008 या काळांत येथे उपसरपंच असलेल्या उदयसिंग यादव यांनी या लेआउट मालकांना शासकीय जागेतून पोचरस्ता देण्यास विरोध केला होता.यासाठी त्यांना काही रक्कमही त्यांनी देऊ केली होती. मात्र शासनाच्या जागेतून असा नियमबाहय रस्ता देण्यात येणार नाही असे यादव यांनी ठणकावून सांगीतले होते .त्या नंत रच्या काळा ंत धर्म राज राहाटे सरपंच झालेत त्यांच्या कार्यकाळातही अशा च प्रकारचा प्रयत्न झाला मात्र त्यांनीही असा रस्ता करण्यास स्पष्ट नकार दिला होता.मात्र सध्याच्या सरपंच योगीता गायकवाड यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत या शासकीय जागेतून तेही ग्रामपंचायतच्या निधीतून व जागेचे मालक असलेल्या जिल्हा परिषदेची कुठलीही परवानगी न घेता लेआउट धारकांना फायदा पोहचविण्यासाठी रस्ता तयार करून दिला.व यासाठी मोठी आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा आरोप ग्राम.पंचायतसदस्य विनोद सावरकर यांनी उपरोक्त तक्रारीत केला आहे.काही ग्रामपंचायत सदस्यांनाही यात लक्ष्मीदर्शन करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.शासकीय जागा व शासअसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सितलवाडी व परसोडा येथे अनेक ले आउट आहेत.मोठी लोकवस्ती असलेल्या लेआउटमधे मागील सुमारे 25 वर्षापासून रस्ते व नाल्यांची सोय नाही.विकास कामे ठप्प पडली आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.