- भीमा कोरेगाव सणसवाडीतील घटनेचा कन्हान येथे निषेध
पारशिवणी/ तालुका प्रतिनिधी ::
सोमवारी नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरु असतानाच सणसवाडीत रस्त्यांवरील वाहनांवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत काही जण गंभीर जखमी झाले होते.ज्यांनतर भीमा कोरेगाव, सणसवाडी परिसरातील दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे पडसाद मंगळवारी राज्यभरा सह कन्हान येथे देखील उमटले.कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर शहरातील समाजबांधवांनी एकत्रित येऊन
कोरेगाव येथील घटनेचा निषेध करत नारेबाजी केली दर्यम्यान शहरातील राष्ट्रीय महामार्गावर देखील ठिय्या मांडून वाहतुक प्रभावित करण्यात आली निषेधाला विद्रोहाचा चेहरा येऊ नये म्हणून कन्हान पोलीस स्टेशन चे ठाणेदार काळे यांनी आपल्या पोलिसांच्या ताफ्या सह मोर्चे कऱ्यांन कडे कूच केली.या वेळी शहर भरातून रोष व्यक्त करत आक्रमक्तेने कोरेगाव दगड फेकीचा निषेध दाखविला तर आंदोलकांनी ठाणेदार काळे यांना हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई करन्या संदर्भात निवेदन दिले या नंतर अस काही होऊ नये या संदर्भाची हाक शासना पर्यँत पोचवण्याची मनीष भिवगड़े, अखिलेश मेश्राम,बाळा मेश्राम,निखिल बागड़े,स्वप्निल नितनवरे,मैयुर पौनिकर,आशीष बागड़े,अभिजीत शेंडे, चंचलेश यादव,सोनू मेश्राम,अल्पेश पौनिकर,आर्यन शेंडे मागणी केली.सोबत ता ३ ला संपूर्ण कन्हान बंद ची हाक देखील देण्यात आलेली आहे.