Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी २७, २०१८

नागपुरात २०० रुपये चिरीमिरी घेणारा वाहतूक पोलीस कॅमेऱ्यात कैद :विडीओ सोशल मीडीयावर व्हायरल

नागपूर/ विशेष प्रतिनिधी:

 सिग्नल बंद असतानाही दुचाकी दामटताना पकडल्या गेलेल्याकडून २०० रुपयांची लाच घेणे एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले.गणराज्यदिनाचे औचित्य साधून शहरातील विविध भागातून भारत माता कि जय म्हणत ,हुल्लळ बाजी करत मुले निघतात .  शुक्रवारी गणराज्यदिनी शहरातील प्रत्येक चौकात, महत्त्वाच्या मार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता याच ठिकाणी वाहतूक पोलीस शाखा ३ चे भुजंगराव थाटे ह्या कर्मचारयाची नियुक्ती होती , दुचाकीवर ट्रिपल  सीट असलेल्या आणि सिग्नल बंद झाला असताना देखील दुचाकी पुढे दामटणाऱ्या (सिग्नल तोडणाऱ्या) दुचाकीचालकाला अडवले. चौकात  बाजूलाच एक पोलीस छावणी होती. 

याच तंबूत या वाहनचालकाला नेण्यात आले आणि हवालदाराणे कारवाईचा धाक दाखवून ६०० रुपये मागितले. ६०० रुपये आपल्याकडे नाही  असे दुचाकीचालकाचे म्हणणे होते, पोलीसाने पुन्हा त्याला टोचणी देत  थाटेने   १२०० रुपये दंडाची चालान पावती बनविण्याचा धाक दाखवला.दुचाकी स्वाराच्या मोबाईलमध्ये या संपूर्ण प्रकारचे चित्रीकरण होते होते, मात्र याची पुसटशीही  कल्पना या पोलीस हवालदाराला नसल्याने  चालकाने येथेच निपटवून टाका, असे म्हटल्या  बरोबर पोलिसाने  ३०० रुपयांची लाच मागितली.मात्र सकाळची वेळ असल्याने जास्त हुज्जत बाजी न करता दोघातही २०० रुपयात बोलणी झाली .दुचाकीचालकाने २०० रुपये समोर करताच  या  पोलीस महाशयाने ते पैसे आपल्या खिश्यात कोंबले. या संपूर्ण घटनाक्रम आणि संभाषणाचे दुचाकीचालकाचा साथीदार मोबाईलमध्ये छायाचित्रण करीत होता. 

विशेष म्हणजे, अशाप्रकारची चिरीमिरी घेण्याचे गैरप्रकार वाढल्याने तसेच पोलिसांकडून वाहन उचलून नेण्याचे प्रकार वाढल्याने अनेक वाहनचालकांच्या मनात वाहतूक पोलिसांबद्दल तीव्र रोष आहे.हा व्हिडीओ शनिवारी सकाळी व्हायरल झाला. तो पोलीस आणि पत्रकारांच्याही व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर आल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली. लाचेची रक्कम मागताना आणि ती स्वीकारताना थाटे त्यात स्पष्ट दिसत असल्याने वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांनी थाटेला तडकाफडकी निलंबित केले. कुणी लाच मागितल्याची तक्रारही केली नाही. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओतून थाटे लाच घेताना दिसतात, त्यामुळे त्यांना आम्ही तडकाफडकी निलंबित केल्याचे उपायुक्त परदेशी यांनी सांगितले. अशाप्रकारे गैरप्रकार करणाऱ्या कुणालाही पाठीशी घातले .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.