Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी १०, २०१८

धरणाच्या कालव्यात पडला वाघ;तब्बल तीन तासाने वाघाला बाहेर काढण्यात वनविभागाला यश

भंडारा/प्रतिनिधी:     

उमरेड - कराण्डला अभयारण्याची शान असलेला जयचंद हा वाघ लागूनच असलेल्या गोसेखुर्दच्या मुख्य कालव्यात पडला असल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली , मिळालेल्या माहितीवरून हा वाघ शिकारी करीता पाठलाग करत असतांना नहरात पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे . .जवळपास  दुपारी १ वाजताच्या दरम्यान हा  संपूर्ण प्रकार घडला असल्याचे समजते आहे,  जयचंद हा तब्बल ३ तास पाण्यातून बाहेर येण्यासाठीचे प्रयत्न करत होता. मात्र  त्याला पाण्याबाहेर येणं  शक्य होत नव्हते . हि घटना वाऱ्यासारखी पसरताच घटनासाठली गावकर्यांनी मोठी गर्दी केली होती
त्याच्या बचावासाठी ,वन विभागची टीम तसेच पोलिसांचा ताफा घटना स्थळी दाखल झाला असून जयचंद या वाघाला पाण्याबाहेर काढण्याचे शर्तीचे  प्रयत्न सुरु झाले आहेत.काही वेळातच वनविभागाच्या पथकाने लांबसीडी लावली आणि काही क्षणातच तो सीडीच्या साहाय्याने बाहेर येत थेट जंगलात निघून गेला .




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.