Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर १९, २०१७

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या महानगर अध्यक्षपदी अमीन मोबीन शेख

चंद्रपूर/प्रतिनिधी:  

 अमीन मोबीन शेख यांची भारतीय जनता पार्टी     चंद्रपूर महानगर अध्यक्ष आमदार नानाजी शामकुळे यांनी नुकतीच भाजपा अल्प सख्याक मोर्चाच्या महानगर अध्यक्षपदी निवड केली. 
सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर यांनी अमीन मोबीन शेख  यांची चंद्रपूर भाजपा अल्प संख्याक मोर्चाच्या महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.अमीन मोबीन शेख यांनी पदाला न्याय देत पुढे भारतीय जनता पार्टीचे ध्येय व धोरण सामान्य नागरिकांन पर्यंत पोहचविण्याचा तसेच  अल्प सख्याक समाजाचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याच्या संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
यापुढे कार्यकरित चंद्रपूर महानगर अल्प सख्याक मोर्चाच्या महानगर  वतीने शहराची व प्रत्येक प्रभागाची कार्यकारणी गठीत करून पक्ष वाढीसाठी कार्य करावे अशा  सूचना चंद्रपूर शहर महानगर अध्यक्ष आमदार नानाजी शामकुळे यांनी दिल्या. 
अमीन मोबीन शेख याना राज्याचे अर्थ नियोजन, वने तथा पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर यांनी पुढील वाटचालीकरिता शुभेच्या दिल्या

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.