चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिर परिसरात १५० गाळेधारकांचे दुकाने आहेत. मात्र मंदिर परिसरातील स्टेडियम च्या जागेवर पूजा सामान विक्रेत्यांनी स्टेडियमच्या जागेवर अतिक्रमण करून त्या परिसरात आपली अवैध दुकाने थाटली आहे त्यामुळे त्या जागेवरील अतिक्रमण हटवून मंदिरातील गाळेधारकांना न्याय देण्यात यावा अशी मागणी तेथील गाळेधारकांनी महानगर पालिकेला केली आहे.
मंदिर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा येथे येणाऱ्या भाविकांना नाही. जसे कि, पार्किंग, संडास बाथरूम, राहण्याची सोय नसल्याने भाविकांची नेहमीच गैरसोय होते. तसेच महानगर पालिकेने व्यापार संकुलाची निर्मिती २००१ पासून केली असूनही काही पूजा सामान विक्रेत्यांनी स्टेडियमच्या जागेवर अतिक्रमण करून आपली दुकाने थाटली आहे.अश्यातच व्यवसाय बरोबर चालत नसल्याने गाळेधारक व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे अतिक्रमण महानगर पालिकेने तात्काळ हटवून गाळेधारक व्यापाऱ्यांना न्याय देण्यात यावा. अन्यथा १५० दुकाने महानगर पालिकेचे टॅक्स भरणार नाही असा इशारा महानगर पालिकेला देण्यात आला आहे.
SHARE THIS