Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर २९, २०१७

गोंडखैरी परिसरात दोन अपघात..! जिवीतहानी नाही....!


बाजारगाव
- राष्ट्रीय अमरावती-नागपूर महामार्गावर टोलटँक्स येथे महाराष्ट्रराज्य परिवहन महामंडळाची गणेशपेठ डेपोची शिवशाही बस-ट्रक अपघात.तसेच  येथून जवळच  असलेल्या कळमेश्वर वळन रस्त्यावर दोन ट्रेलर-ट्रक चा अपघात.
          येथून जवळच गोंडखैरी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या  अपघातात तिन ट्रक व एक शिवशाही बसची मोठी हानी झाली. पहिला अपघात गोंडखैरी ते कळमेश्वर वळन रस्त्यावर गुरुवार (दि.२८/डिसेंबर सकाळी  साडे नऊ) च्या सुमारास टिनूप लाँजिस्टीक पार्क सामोर सिताराम रोडलाईन्सचा ट्रक क्रंमाक एमएच-३१-एपी-२१४० तर लोखंडी पाईप भरलेला ट्रेलर क्रंमाक जिजे-१६-डब्ल्यु-१२५० यांची अमोरासमोर जोरदार धडक झाली असता कोणतिही जिवीतहानी न होता अपघात घडला.या अपघातात ट्रेलरचा  चालक-मालक ईच्छापुर सुरत निवासी अब्दुल गफ्फार शहा वय ३४ वर्षे तसेच ट्रक चालक हसनबाग नागपुर निवासी अली मिर मोहम्मद हसन वय ५१ वर्षे दोघेही किरकोळ जखमी झाले.
      दुसऱ्या अपघातात गोंडखैरीच्या राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर नागपुर वरुन अमरावतीला जात   असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस क्रंमाक एमएच-०९-ईएम-१४७८ ला ट्रक क्रंमाक केए-४०-ए-११८१ ने  धडक दिली. याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर ट्रकला हैद्राबादकडे जायचे होते.तो रस्ता चुकून अमरावती  महामार्गानी निघाला असता  टोलनाक्यावर रांगेत लागल्यावर त्याने हैद्राबाद रस्त्याची विचारणा केली असता माघारी फिरण्यास  सांगण्यात आले.ट्रक चालक महेश ने ट्रक रांगेतूनच मागे घेण्याचा प्रयत्न करतांना मागाहून रांगेत येत असलेल्या बसला धडक बसली.त्यात बसच्या काचा फुटल्या सुदैवाने दोन्ही अपघातात कोणतिही प्राणहानी झाली नाही.
    कळमेश्वर पोलीसांनी घटनेची नोंद करुन पिएसआय सुनिल कामडी एनपिसी गणेश मूतमाळी यांचेसह पुढील तपास सुरु केला आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.