चंद्रपूर/प्रतिनिधी:
कर्नाटक राज्यातील कोप्पल जिल्ह्यात ब्राम्हण युवा परिषदे मध्ये बोलतांना केंद्रातील राज्यमंत्री यांनी भारताचे संविधान बदलण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार मध्ये आलेले आहे. असे वक्तव्य करून भाजपा चे अंतस्थ हेतू स्पस्ट केले आहेत. भारताचे संविधान हे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, प्रजासत्ताक, गणराज्य या तत्वावर उभे आहे. या तत्वाचा अपमान करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेडगे यांचा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भद्रावती कडून जाहीर निषेध करण्यात आला.
तसेच केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेडगे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल केंद्रीय कायदामंत्री व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तात्काळ केंद्र सरकाची या बाबत त्यांची भूमिका जाहीर करावी व समस्त भारतीयांची अशा बेजबाबदार व्यक्यव्या बद्दल माफी मागावी. तसेच अशा बेजवाबदार मंत्राची केंद्रीय मंत्रिमंडळातून ताबळतोड हकालपट्टी करावी असे झाले नाही तर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी संविधान विरोध केंद्र सरकारच्या विरोधात मोठं जन आंदोलन करील असे आव्हान बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भद्रावती कडून करण्यात आले व याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.