काही दिवसांपूर्वी सावली व्याहाड येथील युवक भुपींदर सलूजा या युवकांचा अपघात झाला होता, त्यांच्या नातेवाईकांनी भूपिंदरला मानवटकर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होतं , पण हॉस्पिटलच्या चुकीच्या उपचारामुळे त्या रुग्णाचा 1 डोळा निकामी झाला. व त्याला गँगरीन सारख्या आजाराला सामोरे जावे लागले, नातेवाईकांनी तात्काळ रुग्णाला नागपूरला हलवले पण रुग्णाची परिस्थिती बघता डॉ ने पण उपचार करू पण शक्यता कमी असे सांगितले.
आज पहाटे भूपिंदरचा नागपूर मध्ये मृत्यू झाला, 24 वर्षाचा ह्या युवकाचा अपघाती मृत्यू झाला की डॉ च्या चुकीच्या उपचाराचा बळी ठरला ? हे आणखी समजू शकले नाही .
आज त्या युवकाची पत्नी 7 महिन्याची गर्भवती आहे घरात नवीन बाळ येणार या आशेने त्यांनी आपल्या संसाराची स्वप्न बघत होती, पण काळ की डॉ याने ते स्वप्न सलूजा परिवारापासून सारे सुख हिरावून घेतले.ज्या दिवशी मानवटकर हॉस्पिटल मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ च्या चुकीच्या उपचारविरोधात आवाज उचलला तेव्हा शहरातील काही नामवंत डॉक्टर्स हे डॉ. मानवटकर यांच्या बाजूने होते. पण रुग्णाच्या बाजूने मात्र कुणी बोलले नाही.त्यामुळे आता हे प्रकरण नेमके कोणते वळण घेणार तसेच आयएमए या प्रकरणाची गंभीर दखल घेणार की त्या चुकीच्या उपचारांचे समर्थन करतील का हा प्रश आता उपस्थित झाला आहे, त्यामुळे या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.