Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर ३१, २०१७

जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस शिक्षा

court order साठी इमेज परिणाम
चंद्रपूर/प्रतिनिधी:

पोलीस स्टेशन पाथरी अंतर्गत पिडीत जखीम फियार्दीला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस दिनांक 29/12/2017 रोजी श्री. नि.रा. नाईकवाडे, जिल्हा सत्र न्यायाधीश  -3 यांनी शिक्षा ठोठावली आहे.पोलीस स्टेशन पाथरी अतंर्गत मौजा चिखली येथे पिडीत जखमी फिर्यादी व आरोपी नामे रंजनगुणाजी घुबडे वय 24वर्षे रा. चिखली ता. सावली, जि. चंद्रपूर याचेसोबत प्रेमसंबधाच्या वादाचा कारणावरून पिडीत जखमी हि गावातील तलावाकडे कपडे धुण्यासाठी जात असता नमुद आरोपीने सायकलने पाठलाग करून तिला अश्लील शब्दात षिवीगाळ केली. परत कपडे धुवुन पिडीत जखमी फिर्यादी येत असतांना आरोपीने तिला शिवीगाळ करून काडीने व सतुरने वार गंभीर जखमीकरून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अशा  फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन पाथरी येथे अप.क्र.131/20164 कलम 307, 323, 504 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी पुर्ण करून आरोपी विरूध्द न्यायालयात दोशारोपपत्र सादर केले.
न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक 29/12/2017 रोजी आरोपी नामे रंजन गुणाजी घुबडे वय 24 वर्षे  रा.चिखली ता. सावली, जि. चंद्रपूर यास कलम 307 भादंवि मध्ये 7 वर्षे  सश्रम कारावास शिक्षा  व 7,000/-रु दंड, दंड न भरल्यास 6 महीने शिक्षा, कलम 323 भादंवि मध्ये 1 वर्षे  सश्रम कारावास शिक्षा व 1000/-रु दंड, दंड न भरल्यास 1 महीना शिक्षा, कलम 504 भादंवि मध्ये 2वर्षे शिक्षा व 2,000./-रु दंड, दंड न भरल्यास 02 महिने शिक्षा, श्री. नि.रा. नाईकवाडे, जिल्हा सत्र न्यायाधीश -3 यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणात सरकार तर्फे अॅड. श्री. आसिफ शेख, सरकारी अभियोक्ता, चंद्रपुर तर कोर्ट पैरवी म्हणुन नापोशि  गुणाजी सिडाम पोस्टे पाथरी यांनी काम पाहीले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.