Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर २०, २०१७

ओबीसी बांधव स्वीकारणार बौद्ध धम्माची दीक्षा

Hundreds of OBC members in Nagpur to accept December 25; Celebration on Dikshitbhamboom | नागपुरात शेकडो ओबीसी बांधव २५ डिसेंबरला स्वीकारणार बौद्ध धम्म; दीक्षाभूमीवर सोहळा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
येत्या २५ डिसेंबरला शेकडो ओबीसी बांधव एकाच वेळी नागपूर आणि मुंबईला बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रसह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातील बंजारा, हलबा, मातंग, तेली, माळी, कुणबी, अग्रवाल अशा विविध जातींमधील ओबीसी बांधवांचा समावेश आहे. प्रा. राठोड यांनी नागपुरात दीक्षाभूमीवर होणाऱ्या या दीक्षा समारोहाबाबत पत्रपरिषदेत माहिती दिली. दुपारी १२ वाजता धम्मदीक्षा समारोहापूर्वी संविधान चौकाकडून दीक्षाभूमीकडे धम्मरॅली काढली जाईल. त्यानंतर २ वाजता प्रत्यक्ष दीक्षा सोहळ्याला सुरुवात होणार आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व महाबोधी महाविहार मुक्ती संग्रामाचे धम्मसेनानी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई व लद्दाखचे भदंत संघसेना हे ओबीसी बांधवांना धम्माची दीक्षा देतील. यावेळी प्रा. जैमिनी कडू, डॉ. रुपाताई बोधी-कुळकर्णी, संतोष भालदार व हरिकिसनदादा हटवार आदी मान्यवर परिवर्तित बौद्धांचे मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत बुद्धभूमी येथे याचवेळी हा सोहळा होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनीही ओबीसी बांधवांच्या धर्मांतरास पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.