Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर २१, २०१७

आमदार निवासातील आमदाराच्या खोलीत घुसला साप:बघा कोणत्या आमदाराच्या खोलीत शिरला साप

नागपूर/प्रतिनिधी:
गेल्या १२ दिवसांपासून नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून राज्यभरातील आमदार नागपुरात तळ ठोकून बसले आहेत . याच आमदार निवासात अनेक आमदार देखील वास्तव्यास आहेत.   याच आमदार निवासात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या खोली आहे. आमदार निवासातील व्हरांड्यातून साप आझमींच्या खोलीत घुसला. साप शिरल्याची माहिती मिळताच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सुरक्षित जागा शोधण्यासाठी इतर आमदारांचीही धावाधाव झाली. थोड्या वेळाने सर्पमित्रांना बोलावण्यात आले. शर्थीच्या प्रयत्नानंतर सापाला पकडण्यात यश आले. यात कुणाचेही नुकसान झाले नाही. मात्र, आमदार निवासात राहणाऱ्या आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
या घटनेमुळे आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आझमी यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.