ब्रम्हपुरी ग्रामीण प्रतिनिधी:-
कु.दुर्गा मेश्राम वय रा .खेड (ब्रम्हपुरी )अंदाजे २० हिचे प्रेत विहीरीत दिसले असता ही आत्महत्या नसून हत्या आहे असा खुलासा शव विच्छेदन केल्यानंतर वैधकीय अहवालानुसार विष देवून विहिरीत फेकल्या गेले अशी माहिती झाल्यास पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे तक्रार नोंदवली गेली. तरीही पोलिसांनी आरोपीला अटक न करता अभयदान दिले व सांगण्यात आले की या मुलींनी आत्महत्या केली अशी सूचना मय्यत कुटुंबाला दिली.
सदर घटना रा.खेड गावामध्ये नाटकाच आयोजन दी.७/१२/२०१७ ला मध्ये मय्यत मुलगी आपल्या वहिनी सोबत नाटक पाहायला गेली असता नाटकामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचसुद्धा आयोजन करण्यात आले होते.सांस्कृतिक कार्यक्रम बंद झाल्यानंतर मय्यत मुलगी नाटकाच्या मंडपातून बाहेर लघुशंकेसाठी निघाली असता गोल्डि नामक युवकाने तिची छेडखाणी केली असता मय्यत मुलीनी आणि तिच्या वहीनीनी आरडाओरडा केला असता मय्यत मुलीच्या भावानी छेड़खाणी करणाऱ्या गोल्डि नामक युवकाला मारहाण केली.
दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ तारखेला झालेल्या प्रकाराबाबत मय्यत मुलीला घरच्यालोकांनी शिवीगाळ केली असता रागाच्या भरात मय्यत मुलगी घरून निघून गेली.आणि ही मुलगी छेड़खाणी करणाऱ्या गोल्डि ला दुपारी १२:३० वा .मिळाली तिला गोल्डि ने जेवण दुसऱ्या मुलाला सांगून आणायला सांगितले त्या मुलाने जेवण आणून गोल्डि ला दिले व जेवण त्या मय्यत मुलीला खायला दिले.मय्यत मुलीने अन्न प्राशन केले.
मय्यत मुलगी घरी आली नाही म्हणून घरच्यानी शोधा शोध केला पण मुलगी त्या दिवशी मिळाली नाही. तिसऱ्या दिवशी ९ तारखेला मुलीची शोध घेत असता गावाबाहेरील विहिरी जवळ मय्यत मुलीची ओढणी दिसली अशी माहिती तेथील ग्रामस्थानी दिली लगेच मय्यत मुलीचे कुटुंब घटनास्थळी गेले आणि विहिरीत बघितले तेव्हा मय्यत मुलगी विहिरीच्या पाण्यात तरंगत दिसली तिला लगेच गराच्य साह्याने बाहेर काढून शव विच्छेदणासाठी मृतदेह नेण्यात आले.शव विच्छेदन केल्यानंतर १८ तारखेला मुलीचा विष प्राशन केल्यामुळे झाला अशी माहिती वैधकीय अहवालानुसार प्राप्त झाली. मुलीच्या कुटुंबाला संशय आला असता? पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे तक्रार दिली की मय्यत मुलीला विष देवून तिला विहिरित फेकले हे कृत्य गोल्डि नामक युवकाने केले अशी तक्रार नोंदविले.पोलिसांनी गोल्डि नामक युवकाला अटक केली आणि विचारपूस करू लागले त्या मध्ये आरोपी नी माहिती दिली की मि स्वता जेवण दुसऱ्या मुलाच्या हाताने आणायला सांगितले. मय्यत मुलींनी ते अन्न प्राशन सुद्धा केले.अशी माहिती पोलीस अधिकारी याना दिली आणि त्याला सोडून दिले .सर्व माहिती पोलीसांना असून की सदर मय्यत मुलगी ही पाण्यात बुडुन मृतु झाला नसून विष देवून विहिरित फेकल्या गेल्याने झाला तरी पण पोलिसांनी आरोपी याला मोकाट सोडले.
आरोपिला अटक व्हावी यासाठी उपवीभागीय पोलीस अधिकारी याना निवेदन देतांना श्री.यशवंत दीघोरे cdcc.बँकउपाध्यक्ष चंद्रपूर, मिलिंद भनारे एकलव्य सेना जिल्हाध्यक्ष चंद्रपूर , स्वप्निल अलगदेवे तालुकाध्यक्ष ब्रम्हपुरी, बंडुभाऊ हजारे माजी नगरसेवक चंद्रपूर बाबुरावजी बावणे मत्स्य व्यवस्थापण संघ वर्ग गडचिरोली तसेच ढिवर समाज बहूसंख्यने उपस्थितीत दिले.वा तात्काळ आरोपिला अटक करून मय्यत दुर्गाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनामार्फत देण्यात आला.