ब्रम्हपुरी ग्रामिण प्रतिनिधी :-
ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण परिसराअंतर्गत येणाऱ्या आवळगाव येथे कृषीपंप धारकाचे तक्रार निवारण कार्यक्रम ग्राम पंचायत येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजने अंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.
ज्या शेतकऱ्यांच वीज बिलांची थकबाकी असलेल्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांना मनाला दिलासा देणारी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-2017 जाहीर करण्यात आली होती. या योजनेत शेतकऱ्यांना दंड आणि व्याज बाजूला ठेवून मूळ थकबाकीचे पाच समान हप्ते भरण्याची संधी शासनातर्फे उपलब्ध करून शेतकऱ्यांनी ३१डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली असून त्वरित भरना करावा व ज्यानी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच सन्मान करण्यात आला.जे शेतकरी आपल्या विधुत बिलाच भरना करत नसेल तर त्यांची विधुत खंडित केला जाईल.
तसेच कृषि पंप धारकांच्या तक्रारी असतील त्यानी त्वरित माहिती कनिष्ट सहाय्यक अभियंता कार्यालयाला द्यावे. अशी माहिती कृषीपंप शेतकऱ्यांना मा .श्री.लिखार साहेब उपविभागीय अभियंता ब्रम्हपुरी यानी दिली.