Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर ०७, २०१७

शाहरुखला लाकडी दंड्यानी जबर मारहाण

मोबाईल - घटनास्थळावरुन चार आरोपी फरार..!

कोंढाळी -  कळमेश्वर तालुक्यातील राष्ट्रीय अमरावती-नागपूर महामार्गावर असलेले गोंडखैरी येथे बुधवार(दि.६/डिसेंबरला)दुपारी बारा वाजता शाहरुख कुरेशी याला लाखडी दंड्यानी जबर मारहाण रक्तबंबाळ करुन जखमी केले.मध्यस्थी आलेला बब्बू कुरेशी व क्रिष्णा वाट याला विट फेकुन मारुन किरकोळ दुखापत केली.आठ  दिवसाआधी जखमीची बहिण काँलेजला जात असताना कळमेश्वर वळणरस्त्यावर जबरदस्तीने नविन मोबाईल घेऊन देण्यात आला. मुलगी घरी आल्यानंतर सविस्तर माहीती आई-वडील व भाऊ यांना दिली. दुसऱ्या दिवशी वडील बब्बू कुरेशी व भाऊ शाहरुख कुरेशी यांनी त्या मुलास  माझ्या मुलीस मोबाईल का दिला ? असे  विचारले. आरोपीने दोन  दिवसाआधी भांडण केले. परंतु त्याबाबत कोणतीही तक्रार दिली नव्हती. पुन्हा बुधवारला (दि.६ डिसेंबरला दुपारी बाराच्या दरम्यान याच कारणावरुन चार आरोपी तेजस दशरथ राऊत वय २० वर्षे, निहार दिलीप पोटभरे वय २२ वर्षे, शुभम गायधने वय १९ वर्षे ,योगेश सेवक माकोडे वय १९ वर्षे सर्व राहणार गोंडखैरी यांनी शाहरुख  कुरेशी याला लाखडी दंड्यानी जबर मारहाण रक्तबंबाळ करुन जखमी केले. मध्यस्थी आलेला बब्बू कुरेशी व क्रिष्णा वाट याला विट फेकुन मारुन किरकोळ दुखापत केली. घटनास्थळावरुन आरोपी पसार झाले. घटनेची सविस्तर माहीती कळमेश्वर पोलीसांना दिली. व जखमीस शाहरुख कुरेशी याला खाजगी रुग्णालय वेलट्रीट अस्पताल वाडी येथे ताबडतोब भर्ती करण्यात आले.नंतर कळमेश्वर पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरक्षक चंद्रशेखर बहादुरे यांना झालेल्या घटनेची माहीती देऊन तक्रार करण्यात आली.ताबडतोब घटनास्थळ गाठून चौकशी केली. आरोपीस गुन्हा नोंद कलम ४५२,३२४,५०६,५०४,३३७/३४ भादवी गुन्हा नोंद करुन आरोपीचा तपास पिआय चंद्रशेखर बहादुरे यांच्या नेतृत्वात पिएसआय पुष्पपाल आकरे,पिएसआय शुभांगी ढगे,एचसी प्रकाश ऊइके,पिसी संजू नट,गेडाम पुढील तपास करीत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.