Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर ०७, २०१७

मास विक्रेत्यांच्या दुकानावर चालला बुलडोजर

चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपूर महानगर पालिकेने शहरात अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली असून याची सुरुवात गुरुवारी   बंगाली कॅम्प परिसरातून करण्यात आली.पालिक़ा प्रशासनाने जे सी बी मशीन आणि भारी भक्कम पोलीस ताफ्यासह बंगाली कॅम्प परिसरातील फुटपाथ वरील अतिक्रमण काढण्यात सुरवात केली. 


 सदर फुटपाथ मास विक्रेत्यांनी गिळंकृत केल्याने पाहिलॆला  अतिक्रमण हटाव मोहीम हाती घ्यावी लागली,  या अतिक्रमणामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना अडथडा निर्माण झाला होता. यातील काही अतिक्रमण धारकांनी रस्त्यावरील टिनाचे शेड आणि कच्चे बांधकाम सूचना व नोटीस देऊनही  हटविले नव्हते .त्यामुळे  
आज प्रशासनाच्या सूचनेनंतरही सूचनांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर बुलडोजर  चालविण्यात आला. यावेळी परिसरातील माहोल चांगलेच तापले होते . काही दुकानदारांनी याला विरोध दर्शवित सांगितले की आम्ही ३५ वर्षापासून या परिसरात  दुकान लावले आहेत आणि आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह याच भारोष्यावर चालतो मात्र आज आमच्यावर उपासमारीची वेळ ओढवली असून आमचा परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचं हाच प्रश्न पडला आहे.त्यामुळे आता या अतिक्रमण धारकांचाय दुकानावर बुलडोजर चाललय नंतर पालिका प्रशासन यांना काय पर्यायि व्यवस्था करून देणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.  


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.