Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर ०७, २०१७

दीड लाखांवर धान उत्पादकांना फटका

चंद्रपूर : पट्टयातील संपूर्ण शेती तुडतुड्याने एक लाख ६५ हजार ५९७ शेतकºयांना फटका बसला आहे.
 जिल्ह्यातील मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी येथे बोंडअळी आणि तुडतुडा या रोगाने  प्रकोप केला. एक लाख ८२ हजार हेक्टरवरील कापसापैकी तब्बल एक लाख १० हजार ६२१ हेक्टरवरील पीक बोंडअळीने खावून टाकली तर एक लाख ५१ हजार ६५५ हेक्टरवरील धानपिकापैकी एक लाख पाच हजार ५० हेक्टरवरील पीक तुडतुड्याने उद्ध्वस्त केले. अगदी तोंडात आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी मरणासन्न अवस्थेत पोहचला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी ऋतुचक्राने आपली नियमितता आणि सातत्य कायम राखले नाही. कोणत्याही ऋतुने आपले गुणधर्म दाखविले नाही. वातावरणाच्या या बदलाचा कृषी क्षेत्राला यंदा चांगलाच फटका बसला. यावर्षी जिल्ह्यात एक लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली. तर एक लाख ५१ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रावर धानपीक लावण्यात आले. दोन्ही पिके प्रारंभी चांगले होते. पावसाचे प्रमाण कमी असले तरी शेतकºयांनी पिकांची चांगली काळजी घेतली होती. त्यामुळे पिकांची वाढ भराभर झाली. मात्र सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात अचानक कापसावर बोंडअळीने आणि धानावर तपकिरी तुडतुडा या रोगांनी आक्रमण केले. प्रकोप एवढा मोठा होता की जवळजवळ ९० टक्के लागवड क्षेत्र या रोगामुळे बाधित झाले. तब्बल एक लाख १० हजार ६२१ हेक्टर क्षेत्रावरील कापूस बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाला. दुसरीकडे तुडतुड्याने एक लाख पाच हजार ५० हेक्टर क्षेत्रावरील धानपिकाची तणस करून टाकली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.