विलास मोहिणकर (चिमूर शहर युवक काँग्रेस) यांची मागणी
चिमूर तालुक्यातील वीज बिल हे देयक दिनाकाच्या ७ दिवसाच्या नंतर मिळत आहे ग्राहकास विज बिल देयक दिनांका ऐवजी वीज बिल वितरण करण्यात येत असून संपूर्ण चिमूर तालुक्यातील ग्राहकास प्रती देयक१० रुपये देयक दिनाकानंतर पेंनल्टी भरावी लागते त्यामुळे हा प्रकार ग्राहकांना परवडणारा नाही आहे हा सर्व प्रकार दर महिन्याला तसेच नेहमी नेहमी होणारा आहे हा सर्व प्रकारात चिमूर तालुक्यातील नागरिकांना ग्राहकांना आर्थिक भुर्दंड भरावा लागतो या सर्व प्रकाराला जबाबदार वीज बिल वितरक करणारा खाजगी ठेकेदार तथा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभागीय चिमूर हे असून या संदर्भाची चौकशी करण्यात यावी व खाजगी ठेकेदाराकडून हा ठेका काढण्यात यावा तसेच ज्या अधिकाऱ्यां मार्फत हा प्रकार चालत आहे त्याला निलंबित करण्यात यावा तसेच ग्राहक कायद्यानुसार सबंधित अधिकाऱ्यांवर व व वीज बिल वितरण करणाऱ्या खाजगी ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी व ग्राहकांना होणारा भुर्दंड थांबवून ग्राहकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यात यावे अशी मागणी चिमूर शहर युवक काँग्रेसचे विलास मोहिणकर यांनी उपविभागीय अभियंता चिमूर , जिल्हाधिकारी चंद्रपूर, कार्यकारी अभियंता संचालन विभाग म रा वि वि कंपनी वरोरा याना निवेदनातून केली आहे