डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतांना काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया |
चंद्रपूर/प्रतिनिधी:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य आज हजारो बौद्ध अनुयायांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात एकत्रित होऊन अभिवादन केले. तसेच सायंकाळच्या सुमारास शहरातून भव्य कँडल मार्च काढत त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर माहिती देणारे विविध स्टॊल देखील या परिसरात लावण्यात आले होते. एकंदरीतच आजचा हा दिवस संपूर्ण भीम जनसागराने उसळून निघाला होता.तसेच विविध पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांनी सकाळच्या सुमारास पुतळा परिसरात एकत्रित होऊन पुतळ्याला अभिवादन करत पुष्पमाला अर्पण केली.