Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर ०६, २०१७

त्या कचरा कन्टेरचा भंगारमध्ये लिलाव करा - राजू शर्मा

चिमूर नगर परिषदच्या  कचरा कन्टेरकडे दुर्लक्ष
 चिमूर/प्रतिनिधी:
          चिमूर नगर परिषद ने कचरा वाहतूक करण्यासाठी कचरा कन्टेर    खरेदीला  मागील दोन वर्ष झाले असून  त्या कन्टेर चा     उपयोग अजून पर्यत झाला नसल्याने नप च्या पैशाचा दुरुपयोग झाला    असल्याचा   आरोप  तालुका युवक कांग्रेस तालुका   सरचिटणीस राजू शर्मा यांनी केला असून त्या कचरा कंटेनर भंगार मध्ये लिलाव मध्ये विकण्याची मागणी केली आहे 


   चिमूर नगर परिषद ने मागील दोन वर्षा पूर्वी कचरा कंटेनर खरेदी केले असून फुटबाल ग्राऊंड वर ठेवलेले आहे कंटेनर जन्ग खात पडले असून त्या कडे नप चे लक्ष नाही केवळ  चिरीमिरीसाठी कंटेनर खरेदी केले परंतु त्या कंटेनर चा वापर ज्या कामासाठी होता त्या साठी अजून पर्यत वापर करण्यात आला नाही फुटबाल ग्राउंड वर कंटेनर पडलेले असून त्या कडे दुर्लक्ष केले जात आहे नप ने कंटेनर चा वापर करीत नसेल तर ते भंगार मधून लिलाव करावे जेणेकरून आलेली आय हि नप च्या सार्वजनिक हितासाठी उपयोगी  पडेल नप ची कचरा कंटेनर भंगार मध्ये लिलाव करण्याची मागणी तालुका युवक कांग्रेस तालुका सरचिटणीस राजू शर्मा यांनी केली आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.