Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर ०६, २०१७

पोलिसांची अरेरावी;तक्रारदाराला धमकावले

पोलिस-नागरिक समन्वयाची नितांत गरज

पारशिवणी तालुका प्रतिनिधी :
प्रत्येक नागरिकात वर्दी नसलेला पोलिस अन पोलिसात सामान्य नागरिक दडलेला असतो,याची जाणीव ठेवावी, अशी सामान्य जनतेपासून तर सर्व पोलिस अधिकाऱ्यांची अपेक्षा असते.आणि ही अपेक्षा अपेक्षित ही आहे. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' चा नारा केवळ पोलिसांनीच का द्यावा.? स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी स्वत: का घेऊ नये.? हाच नारा नागरिकांनीही दृष्ट प्रवृतींच्या संहाराकरीता दिला तर गुन्हेगारी आटोक्यात आणण्यास त्याची मदतच होईल, यात तीळ मात्र ही शंका नाही. परंतु नागरिकांच्या या कर्तबगारीचे श्रेय पोलिस घेणार नाहीत, याची खात्री पोलीस प्रशाषण देऊ शकत का ? मदत करणाऱ्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात पोलीस उभे करणार नाहीत,याची काय शाश्वती ? पोलिसांची कार्यपद्धती पाहता तसे होण्याचीच शक्यता अधिक. कारण पोलिस नागरिकांबद्दल आपुलकीची भावनाच ठेवत नसल्याची घटना पारशिवणी तालुक्यातील भाजप पक्षाचे कार्यक्रते लीलाधर बर्वे यांच्या सोबत जरीपटका पोलीस स्टेशनला नागपूर येथे अपघाताची सूचना द्यायला गेले असता घडली.

फिर्यादी लीलाधर बर्वे यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार बर्वे दि ३० नोव्हेंबर ला नागपूर जरीपटका रिंग रोड मार्गे सपत्नीक दोन मुला सोबत आपल्या घरी कांद्री,कन्हान येथे रात्री १०:०० च्या सुमारास कार क्रमांक एमएच-४०-केआर- ९८३७ ने परत येत होते.परतीच्या प्रवासात मार्टिन नगर नजीक ट्रक क्रमांक एमपी-२० एचबी-३५३८ ने बर्वे यांच्या कार च्या उजव्या बाजूने जबर धडक दिली धडक दिल्या नंतर ट्रक चालकाने घटना स्थळा वरून ट्रक सह पसार होण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु प्रत्येक नागरिकात वर्दी नसलेला पोलिस असतो हे लक्षात घेता कुठलाही कायदा हातात न घेता बर्वे यांनी १०० क्रमांकावर फोन करून सदर घटनेची सूचना देऊन ट्रक चालकाचा पाठलाग केला.कामगार नगर नजीक बर्वे यांना ट्रक थांबावीन्यात यश आले जिथे बर्वे यांना ट्रक चालक नशेत तल्लीन होऊन ट्रक चालविण्याचे निष्पन्न झाले ज्यावर ताबडतोब पुनश्च १०० क्रमांकावर फोन करून ट्रक पकडलेल्या ठिकानाचा पत्ता पोलिसांना देण्यात आला संभवता ताबडतोब पोलीस घटना स्थळा वर पोचले नशेत धुत ट्रक चालकाला पकडून बर्वे यांना पोलीस स्टेशनला येण्यासही सांगितल्या गेले.बर्वे हे  परिवारासह रात्री ११ ला पोलीस स्टेशन जरीपटका येथे आपल्या दोन लहान मुलांन सह सपत्नीक पोचले.रात्री उशिर होणार सोबत मुलं व पत्नी असल्याने थोडी लवकर रिपोर्ट दाखल करून आम्हा जाऊ द्या असे म्हंटल्या नंतर देखील पोलिसांनी साहेब येणार म्हणून बर्वे यांना तब्बल अर्धा ते एक तास स्टेशनला तळ मांडून बसवून ठेवले.त्यानंतर रात्री ११:३० च्या सुमारास साहेब म्हणजे एपिआय डहाके हे पोचले,सर्वात आधी ट्रक चालकाची आपबीती एकुन घेत पोलिसांनी बर्वे यांनाच उलटे तोंड देत कर्तव्यावर असलेल्या एपिआय डहाके यांनी बर्वे यांना धमकवायला सुरवात केली असल्याची माहिती बर्वे यांनी दिली.महत्वाचे म्हणजे घटनेच्या फिर्यादी सोबत आरोपी सारखी वागणूक देणे व आरोपीला सासुरवाडीत बसविल्यागत त्याच्या कल घेणे म्हणजे 'पाणी नेमकं मुरलं कुठ' हा प्रश्न निर्माण करतो.आरोपीला गाडीतुन जरीपटका स्टेशन गाठेपर्यंत ट्रक चालक आणि मालक यांच्यात काही साट लोट घडवून आणून पोलिसांना ट्रक चालक आरोपी या जावयाच्या बापाकडून काही अहेर देण्याची बात तर झाली नसेल ना याकडे सदर वागणुकीमुळे लक्ष केंद्रित होते.सदर प्रकरणात ट्रक चालक व एपीआय डहाके या दोन्ही गैरअर्जदारांची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी अशी माफक अपेक्षा फिर्यादी बर्वे यांची होती.

पोलिसांचे पुराव्याकडे दुर्लक्ष...

सदर प्रकरणातील घटना स्थळा वर सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले असताना पोलिसांनी सीसीटीव्ही द्वारे फुटेज तपासात घेऊन गुम्ह्णाची शहनिशा करणे देखील गरजेचे समजले नाही.कदाचित सीसीटीव्ही मुळे प्रकरनातील नेमकी चूक कुणाची हे लक्षात घेता आले असते व प्रकरनाला कुठलाही वेगळं वळण न येता फिर्यादीला कुठलाही मनस्ताप सहन न करता न्याय मिळाला असता.

 डहाके यांच्या वर कार्यवाही च्या मागणी ला जोर..

बर्वे यांच्या वर झालेल्या अपघाताच्या आघाता पेक्षा त्यांच्या वर जरीपटका पोलीस स्टेशन इथे झालेल्या कर्तव्यावर असलेल्या खादीच्या दाहक अभद्र व्यवहाराने ते आहत झालेले आहेत.तेव्हा केंद्रात आणि राज्यात सत्ते वर असलेल्या भाजप पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची जर ही अवस्था असेल तर सर्व सामान्यांचे काय हा प्रश्न उभा होतो.कार्यरत एपीआय डहाके यांच्या असभ्य वागणूक बघता बर्वे यांनी स्टेशन मधील संपूर्ण प्रकरण आपल्या मोबाईल मध्ये व्हिडीओ स्वरूपात रिकॉर्ड करून घेतले.रात्री कुठल्याही प्रकारची तक्रार न नोंदविता बर्वे यांनी घरी परतणेच योग्य समजून परिवारा सह घरी परतले.त्यानंतर २ डिसेंबर ला बर्वे यांनी लेखी स्वरूपात जरीपटका स्टेशन, पोलीस उपायुक्त नागपूर शहर,सहायक पोलीस उपायुक्त नागपूर यांना लेखी स्वरूपात आपली तक्रार दिल्यानंतर देखील कुठल्याही प्रकारची कार्यवाही ट्रक चालका विरोधात झाली नसल्याने भाजप च्या कार्यकर्त्यांची तळ पायाची आग मस्तकात जाऊन पेटली. ज्यानंतर मनोज चवरे,योगेश वाडीभस्मे,अतुल हजारे,प्रशांत वाघमारे,राजेश ठाकरे,रिंकेश चवरे,अमोल साकोरे,धर्मेंद्र गणवीर,विनोद किरपान,वीर सिंग यांच्या सह १०० भाजप कार्यकर्त्यानी जरीपटका पोलीस स्टेशन गाठत कर्तव्यावर असताना गैरव्यवहार करणारी एपिआय डहाके यांच्या रिकॉरडेड व्हीडियो ची डीव्हीडी तयार करून तक्रार निवेदन प्रतिलिपी स्वरूपात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवून डहाके यांच्या वर कार्यवाहिच्या मागणीने सूर धरला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.