शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन १५डिसेंबर ला रस्ता रोको आंदोलन
डॉ. सतीश वारजूरकर करणार नेतृत्व
चिमूर/रामदास ठुसे
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता जिल्हा परिषद चंद्रपुरचे माजी अध्यक्षतथा विद्यमान गटनेता सदस्य डॉ. सतीश वारजूकरांच्या नेतृत्वात दिनांक १५ डिसेंबर रोज शुक्रवार ला सकाळी ११ वाजता भिसी येथील चौरस्ता येथे बैलबंडी मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन केले आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी मांङल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने भिसी वाढोणा येथे वनविभागाने मंजूर केलेल्या जाळीच्या कुंपणाचे निविदा पुनश्च काठण्यात याव्या, जंगली जनावरांपासुन होणारी शेतीची नुकसान भरपाई नुकसानीच्या तुलनेत देण्यात यावी, स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव व अधीकचा ५० टक्के नफा देण्यात यावा, शेतकऱ्यांसाठी २४ तास थ्री फेज विद्युत पुरवठा देण्यात यावा, कृषी पंपाची डिमांड भरताच एक महिण्याच्या आत विजजोडणी झालीच पाहिजे, गोसेखुर्द प्रकल्पाच्या मोखाबर्डी उपसा जलसिंचन कालव्याचे दुरूस्तीसह बांधकाम पुर्ण करून २०१७ ला शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणि देण्याचे आश्वासन लोकप्रतीनिधींनी पूर्ण करावे, शेतमजुरांना शेतीसाठी शासकिय जमिनीचे पट्टे वाटप करण्यात यावे, वनडेपोत बांबु व लाकडांचा पुरवठा नियमित उपलब्ध करून देण्यात यावा, भिसी परिसरातील चिचोली सावर्ला, डोंगर्ला, जांभुळविहिरा, नवेगांव, पुयारदंड, गडपिपरी, सिरसपुर, शिवरा, लावारी, इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या शेती जंगल लगत असल्यामुळे त्यांच्या शेतातील पिकांची जंगली जनावरे नासधुस करित असतात त्यामुळे सदर गावांच्या जंगल सभोवताल काटेरी कुंपन करण्यात यावे, विद्युत कंपण्यांमार्फत शेतात उभारल्या जाणाऱ्या विद्युत टावर चा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा.
उपरोक्त मागण्या मान्य करवून घेण्याकरीता आयोजीत मोर्चामध्ये तालूक्यातील सर्व जनतेनी हजारोंच्या संख्येने ग्राम सचिवालय बाजार चौक भिसी येथे उपस्थित राहावे असे आव्हान भिसी कॉग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.