Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर १०, २०१७

भीषण अपघातात 1 ठार, चार जखमी

दुचाकीला धडक देत चहाटपरीत घुसली चारचाकी

पारशिवणी तालुका प्रतिनिधि ::

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ स्थित कन्हान शहरातील डॉ.आबेडकर चौक नजीकच्या तनु इलेक्ट्रॉनिक पुढे ता.१० ला मारुती ब्रिजा या चारचाकीने एका दुचाकी चालकाला सह चहा टपरी ला उडवत कबाडी च्या दुकानात जाऊन शिरली ज्यात एक इलेक्ट्रॉनिक दुकानात उभ्या असलेल्या नव्या कोर्या फॉर्च्युनर चारचाकीच नुकसान झालं अपघातात ४ जख्मि तर १ दुचाकी चालक 

सुशील दामोधर पाटील वय ३१ राहणार गहू हिवरा याचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेडकर चौक येथे ३:१५ च्या सुमारास मारुती ब्रिजा गाडी क्रमांक एमएच ४० बीई १५९५ चालक संदीप उर्फ बंटी नागोराव कडू  राहणार हनुमान नगर,कन्हान,वय ३५ हा आपल्या कुटुंबा सह कामठी वरून नागपूर जबलपूर महामार्गाने येत असताना कन्हान डॉ.आंबेडकर चौक स्थित तनु इलेक्ट्रॉनिक पासून हनुमान नगर साठी रस्ता वरून वळण घेताना गाडी चालक संदीप उर्फ बंटी कडू यांचे संतुलन गाडीवरून सुटले ज्यात कुणालाही काहीही समजण्या अगोदर गाडी ने वेग घेत एका एकी रस्त्याच्या उजव्या बाजू वरून डाव्या बाजूला फिरकली ज्यात कन्हान वरून कामठी मार्गे जात असलेल्या हिरो पैशन दुचाकी क्रमांक एमएच ४० एजे ६७२२ ला चिरडत रस्त्याच्या कडेला असलेली चहा टपरी चालक रोशन भीमटे राहणार कन्हान तर कबाडी दुकानातील प्रकाश लोणारे व कबाड विक्रेता मुकेश सतलाल दोघेही राहणार कन्हान यांच्या दुकानात जाऊन शिरली ज्यात दोघानाही किरकोळ जखम झाल्यात

धडक इतकी जबर होती की दुचाकिंचा चुराडा झाला व अपघातातील मृत दुचाकी चालक सुशील दामोधर पाटील वय ३१ राहणार गहू हिवरा याच्या हेल्मेट फाडून डोक्याला व पोटाला जबर मार लागला तर दुचाकीवर मागे बैसलेला राजेश मधुकर पालकर वय ३० राहणार शिवनगर कन्हान

याचा पाय फ्रक्चर असून त्याचीही स्थिती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.धडकेत महामार्गा ला लागून असलेल्या तनु इलेक्ट्रॉनिक समोर उभ्या असलेल्या फॉर्च्युनर गाडीला लागलेल्या धडकेत हानी झाली.अपघाताची माहिती मिळताच कन्हान एपीआय नीलकंठ राऊत घटना स्थळावर पोचले व जख्मि दुचाकी चालकांना ताबडतोब कामठी येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले तर चहा टपरी व कबाडी दुकानातील जख्मिना कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून घरी पाठविण्यात आले.अपघातात ४ लोकांना जबर व किरकोळ जखमा झाल्यात तर दुचाकी चालक सुशील दामोधर पाटील वय ३१ राहणार गहू हिवरा याच्या डोक्याला व पोटाला मार लागल्याने चौधरी हॉस्पिटल कामठी येथे उपचारा दरम्यान संध्याकाळी मृत्यू झाला.तर वेळीच मारोती ब्रिजा चारचाकीचे एयर बैग उघडल्याने चारचाकी चालक व गाडीतील लोकांना तिळ मात्रही दुखापत झाली नाही.घटनेतील गाडी व चालकाला पोलिसांनी तपासत घेऊन समोरील तपासाला सुरवात केली आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.