- चंद्रपूर- चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने चंद्रपूर येथील सुरज हिंदी प्राथमिक शाळा लालपेठ येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. गुरुवारीवारी घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली असून, सर्व विषबाधित विद्यार्थ्यांना चंद्रपूर येथील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे '.
- चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 15 विद्यार्थी पाझारे यांच्या खाजगी रुग्णालयात 7 विद्यार्थी तर लोढिया यांच्या खाजगी रुग्णालयात 10 विद्यार्थी उपचारासाठी भरती करण्यात आलेले आहे त्यामुळे घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे पंधरा दिवसांपूर्वी नागभीड़ तालुक्यातील कोर्धा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी 26 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. हे सर्व विद्यार्थी 10 ते 14 वर्षे वयोगटातील असून यातील काही विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली आहे.आणखी काही विद्यार्थी ईतर रुग्णालयात असल्याचे व्रुत आहे
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, डिसेंबर ०७, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments