Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर १५, २०१७

येथे पोहोचतो 'पुढारी' पण पोहोचत नाही विकासाची शिदोरी

सिहोरावासी मूलभूत सुविधांपासून वंचित
         स्पेशल रिपोर्ट            
  • टेकाडी :: सिहोरा येथील ग्राम पंचायत काळातील नालीची अवस्था. 
 टेकाडी (जि. नागपूर )/ प्रतिनिधी : स्वच्छ: भारत व डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणारा ग्रामीण भारत आजही विकासापासून मागासलेला असल्याची प्रचिती तालुक्यातील सिहोरा गावाचे वास्तववादी चित्र पाहून येते. कन्हान पिपरी नगर परिषदअंतर्गत येणा-या प्रभाग क्रमांक २ मधील सिहोरा गाव सध्या नगर परिषदेच्या उदासीन धोरनांमुळे मूलभूत सुविधांन पासून वंचीत आहे.निवडणूका आल्या की स्थानीय नागरिकांना विकासाची प्रलोभने देऊन पुढारी निघून जात असल्याचा आरोप स्थानीकांनी लावलेला आहे.
  • साधारनत: तीन हजारांचा लोक संख्येतील सिहोरा गाव कन्हान नगर परिषदेच्या हद्दीत आहे. गावाला कन्हान नगर परिषद मध्ये विलीन केल्याने गाव विकासा ऐवजी समस्यांचं माहेर घर झाल्याचे चित्र आहे.नगर परिषदे कडून लाखाच्या घरात स्वछ:ते वर खर्च केला जातो.तरीही सिहोरा सकट क्षेत्रातील बर्याच प्रभागांन मध्ये अद्यपही घाणीच साम्राज्य आहे.रामटेक विधान सभा क्षेत्राचे  आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते विविध कामांचे उदघाटन कन्हान मध्ये करण्यात आले पण सिहोरा कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांचा आहे.सिहोरा गावात नाल्या भरुन जीर्ण अवस्थेत असून नाल्याची सफाई होत नाही.
  • गावातील रखडलेले रस्ते,रस्त्यांना पथदिव्याची व्यवस्था नसणे,रात्रीला रहदारी करणे देखील स्थानिकांना कठीण आहे.गावातून कन्हान ला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत.गावाचा ३ किमी लांबीचा मुख्य रस्ता एम.जी.नगर वाघदरे वाडी कन्हान येथून गावात शिरण्यासाठी आहे.ज्यात डांबर कमी आणि गिट्टी व गड्डे जास्त आहेत.सिहोरा गावात सातवी पर्यँत शाळा आहे.मुख्य म्हणजे सिहोरा लगतची १६८ हेकटर जागा ही ओद्योगिक क्रांती साठी आरक्षित करण्यात आलेली असून येथील युवा वर्ग नोकरीसाठी अद्यापही चपला झिजवतांना दिसून येतो.
  • विशेष म्हणजे सिहोरा येथे पर्यटन स्थळ म्हणून गौतम बुध्दाचे स्मिरिच्युल पार्क आहे.सोबतच लाखो रुपयांची उलाढाल कन्हान नदी येथून निघणाऱ्या सिहोरा वाळू घाटा मधून केली जाते ज्यातून राजस्व विभागाला फायदा होतच असेल तरीही हे गाव दुर्लक्षित का.? महाशक्तीचे स्वप्न पाहणाऱ्या भारतात आजही ग्रामीण भाग विकासापासून कोसो दूर आहे.अशा परिस्थितीत स्वछ: भारत,डिजिटल इंडिया व थोर पुरुषांच्या स्वप्नातील भारत कसा घडेल हाच प्रश्न निर्माण होत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.