Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर १८, २०१७

मंदिराच्या गाभाऱ्यात रक्ताचा सडा

शिराळ्यातील शिवरवाडीत खून

सांगली:  शिराळा तालुक्‍यातील शिवरवाडी येथील चक्रोबा मंदिराच्या गाभाऱ्यात आज (शनिवार) सकाळी एका 50 वर्षीय पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. आमावस्येच्या रात्री हा प्रकार उघडकीस आल्याने खून की नरबळी ? याबाबत चर्चा सुरु आहे.

मृतदेहाच्या डोक्‍यात धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला आहे. त्याच्या जवळच लिंबू, हळद-कुंकू असे साहित्य सापडल्याने हा प्रकार नरबळीचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शिरसी-शिवरवाडी रस्त्यावर डोंगरावर मंदिर आहे. मंदिराचा परिसर डोगरावर निर्जन आहे.

मंदिरात खून झाल्याचे समजताच घटनास्थळी गर्दी झाली. शिराळा पोलिसांनीही घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाशेजारी लिंबू, हळद-कुंकू, पूजेचे साहित्य पडले होते. या मृतदेहाची ओळख दुपारपर्यंत पटलेली नव्हती. पाठीमागून धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसत आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असावी.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.