Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर १९, २०१७

राष्ट्रीय महामार्गाने बांधकामात घेतला एक बळी

सुरक्षा व्यवस्थे ला कंत्राट दाराकडून काना डोळा 

पारशिवणी :: सतीश घारड

नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील एनएचआय ४४ चे रुंदीकरनाचे कार्य प्रगतीवर आहे.बांधकामाचे कंत्राट केसीसी बिल्डकॉन या कंपनीला असून कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील कांद्री पेट्रोल पंपा सामोरील महामार्गाचे कार्य सुरू असताना कंत्राट दाराकडून सुरक्षेच्या अभावी व ग्रेडर चालकाच्या निष्काळजी पणाने वेकोली येथील एका २२ वर्षीय युवकाला अपघातात आपले प्राण गमवावे लागले.

फिर्यादी आशिफ निजामुद्दीन अंसारी वय २० राहणार टेकाडी कामठी कॉलरी खदान नंबर ३ दयानगर माडीबाबा

यांच्या तक्रारी नुसार फिर्यादी व अपघातातील मृतक एजाज उर्फ पंमी जमशेद अंसारी वय २२ वर्षे राहणार वेकोली कामठी कॉलरी टेकाडी नंबर ३ येथील होता.हे दोघेही स्प्लेंडर प्रो क्रमांक एमएच ४० एयु २८९१ या क्रमांकाच्या गाडीने डबल सीट घरून निघाले होते.एजाज अंसारी याची बहिण ही डागा हॉस्पिटल नागपूर येथे असल्याने तिचा जेवणाचा डबा घेऊन व संगतीला आशिफ निजामुद्दीन अंसारी हा कामठी येथे काचाच्या दुकानात कामाला असल्याने दोघेही सकाळी १० वाजता घरून निघाले असता राष्ट्रीय महामार्गाला लागले कांद्री पेट्रोल पंपाच्या थोड्या सामोर महामार्गाच्या दोन्ही बाजूने माती भरुन लेव्हल करण्याचे कार्य सुरू असल्यामुळे रोडवर दोन्ही बाजूने ट्रक उभे होते. तर रोडच्या एका बाजूला ग्रेडर म्हणजे माती लेव्हल करणाऱ्या मशीन चे काम सुरू होते.अश्यात रोड च्या एका कोपऱ्यातून दुचाकी काढत असताना ग्रेडर चालक याने बेजबाबदार पणे ग्रेडर रिव्हर्स घेतले असता दुचाकीला धक्का लागला ज्यात दुचाकी चालक एजाज उर्फ पंमी जमशेद अंसारी व फिर्यादी हे गाडी घेऊन रोड वर आधळले ज्यात एजाज याच्या डोक्याला जबर मार लागला तर आसिफ याला थोडी फार दुखापत झाली.एजाज ला महामार्गावरील वेकोली जे.एन.हॉस्पिटल ला नेले असता त्याला ताबडतोब कामठी येथील आशा हॉस्पिटल ला हलविण्यात आले.जिथे आय.सी.यु मध्ये एजाज याने तास भरात प्राण सोडले मृतकाला शवविच्छेदना साठी कामठी येथील शाष्कीय रुग्णालयात नेण्यात आले.कन्हान पोलिसांनी अनोळखी फरार आरोपी ग्रेडर चालक याच्या विरोधात ३७६/१७ कलम ३३६,३३७,३०४ ( अ ) भांदवी च्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला असून सामोरील तपास कन्हान पोलीस करीत आहे.

नागपूर जबलपूर महामार्ग हा कन्हान शहर ते टेकाडी फाट्या पर्यंत अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे.महामार्गाचे कार्य वेगाने सुरू असताना केसीसी बिल्डकॉन कंपणी कडून कुठल्याही प्रकारचा सुरक्षा इंचार्ज,सुरक्षा बेल्ट,रस्त्याच्या कोपऱ्यामध्ये बॅरिकेट्स,रात्रीला रेडियम किंवा सूचना फलके अश्या कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने अपघातात वाढ होत असल्याचे आरोप जमावाने करतच असताना मृतकाची बातमी क्षेत्रात पसरताच महामार्गावर लोकांच्या जमावाने २ वाजताच्या सुमारास महामार्गाचे बांधकाम बंद पाळून केसीसी कंपनी चा ट्रक क्रमांक एमएच ४० बिजी २५१९ याला जाळन्याचा प्रयत्न केला असून ट्रक ची काचा फोडली तर टायर पंक्चर केली.जमावाचा आक्रोश बघता कन्हान पोलीस पीएसआई धवड़,हाके,राजेंद्र पाली,नितिन आगाशे,शिता यांनी घटना स्थळ गाठले ज्यांनतर परिस्थिती हाताबाहेर बघता काँग्रेस नेते नरेश बर्वे,जिल्हा परिषद सदस्य शिवकुमार यादव,प.स.सदस्य साबिर सिद्दीकी, कांद्री सरपंच बलवंत पडोले,ग्राप सदस्य ऋषि नगरकर,आनंद नायडू यांनी पुढाकार घेत लोकांचा आक्रोश कमी करून २ ते ३ तासांनी रस्त्यांचा जाम थांबवुन कन्हान ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.ज्यांतर एसडीपीओ ईश्वर कातकडे,कन्हान थानेदार चंद्रकांत काले खापरखेड़ा येथून एपीआय डेकाटे, मौदा येथून एपीआय मस्के आपल्या ताफ्या सह कन्हान पोलीस स्टेशन ला पोचले असता फिर्यादी आप्तस्वकीयांच्या जमावाने कन्हान पोलीस स्टेशन गाठत केसीसी बिल्डकॉन कँपनी चा ग्रेडर चालका विरोधात गुन्हा दाखल करून घेतला.

 # या आधीही झाली होती अवैध माती वाहतुकीची कार्यवाही....

केसीसी बिल्डकॉन कँपनी च्या माती ओव्हरलोड केलेल्या ५ ट्रॅकांवर कार्यवाही झाली आहे.नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील एनएचआय ४४ चे कार्य कांद्री,टेकाडी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या महामार्गाचे कार्य बिल्डकॉन प्रा.ली.कंपनी कडून २५३ कोटी रकमेने  बनत आहे.रोड साठी लागणारा मुरूम बिल्डकॉन कंपनी कामठी वेकोली येथून २ नोव्हेंबर २०१७ ते ९ फेब्रुवारी २०१८ पर्यंत रॉयल्टी घेऊन माती नेण्याचा परवाना जिल्हाधिकारी कार्यलय खनिकर्म विभागातून घेतला. केसीसी प्रा.ली.कडून कामठी ओपन कास्ट येथून पिवळ्या मातीची वाहतूक सुरू करण्यात आली.केसीसी च्या ट्रकांन मध्ये रॉयल्टी पेक्षा जास्त माती वाहून नेण्याच्या चोरीच्या प्रकरणात माजी आमदार आशिष जैस्वाल यांनी पकडून त्यांच्यावर कार्यवाही करून घेतलेली होती.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.