Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर ०४, २०१७

कौटुंबिक कलहातून प्राचार्य वानखेड़े यांची हत्या

प्राचार्य वानखेडेच्या खुनाचा उलगडा 24 तासांचा आत
नागपूर :(ललित लांजेवार)
शुक्रवारी सकाळी नागपूर चंद्रपूर मार्गावरील निरी गेटसमोर प्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांच्या  खुनाचा तपास नागपूर पोलिसांनी 24 तासात लावलेला आहे. तपासात धक्कादायक बाब समोर आली ति म्हणजे कुटुंबीयांनीच सुपारी देऊन प्राचार्य वानखेड़े यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.


55 वर्षीय प्राचार्य मोरेश्वर वानखेडे हे चंद्रपूरमधल्या टुकूम इथल्या खत्री कॉलेजमध्ये प्रचार्च पदावर कार्यरत होते. त्यांच्या हत्येप्रकरणी पत्नी अनिता, विवाहित मुलगी सायली आणि मुलीचा मित्र शुभम सहारे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्राचार्य वानखेडे यांची नागपुरात हत्या झाल्यानंतर चे वृत्त पसरताच त्यांच्या हत्येमागे अनेक तर्कवितर्क लावले जात होते कोणी म्हणत होते की सध्या विद्यापीठात निवडणुकीचे वारे सुरू आहे तर कुणी काही वेगळं! यातच पोलिसांनी तपास योग्य दिशेने फिरवला आणि समोर जे आलं ते अतिशय धक्कादायक होत

नागपूरच्या शुक्रवारी प्राचार्य वानखेडे यांची  तलवारीने वार करुन हत्या करण्यात आली होती. वानखेडे शुक्रवारी नेहमीप्रमाणे दुचाकीने रेल्वे स्थानकाच्या दिशेने रवाना झाले. मात्र वर्धा रोड परिसरातील निरी संस्थेसमोरील रस्त्यावर त्यांची दुचाकी पाडून तलवारीने त्यांची हत्या केली.

वानखेड़े यांच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते.याच कौटुंबिक वादातून 4 लाखांची सुपारी देऊन वानखेडे यांची हत्या घडवून आणल्याची कबुली पत्नी अनिता वानखेडे आणि मुलीने पोलिसांना दिली. त्यापैकी 20 हजार रुपये मारेकऱ्यांना देण्यात आले होते. वानखेडेंच्या मुलीच्या मित्राने भाडोत्री मारेकरी शोधण्यास मदत केली. हे मारेकरी हत्येच्या 2-3 दिवस आधी प्राचार्य वानखेडे यांच्या हालचालींवर नजर ठेवून होते.आणि अखेर शुक्रवारी त्यांनी वानखेडेंची हत्या केली. शुभम सहारे याची माहिती दिल्यानंतर मारेकरी निघून गेले.

प्राचार्य मोरेश्वर वानखेडे अतिशय तापट स्वभावाचे होते. घरी किंवा बाहेरही त्यांचे नेहमीच वाद व्हायचे. त्यांच्या या स्वभावामुळे घरातील वातावरण तणावाचं असायचं. ह्यालाच कंटाळून त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीने त्यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिली.

या प्रकरणी पत्नी, मुलगी, तिचा मित्र आणि दोन मारेकऱ्यांना अटक केली असून दोन मारेकऱ्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत  आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.