Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर ३०, २०१७

अनिकेतची हत्या पोलीस खात्याला कलंक, दोषींना फाशी द्या: आठवले


  
सांगली: अनिकेत कोथळेच्या हत्येप्रकरणी जो कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. ते सांगलीत बोलत होते.

अनिकेत कोथळेचे खून प्रकरण हे पोलीस खात्याला कलंक लावणारी घटना असून, पोलीस कोठडीत थर्ड डिग्री वापरणे कायदेशीररित्या योग्य नाही. जे पोलीस थर्ड डिग्रीचा वापर करत असतील त्यांना पोलीस खात्यात ठेऊच नये असं मतही आठवले यांनी व्यक्त केलं.

थर्ड डिग्रीत अनिकेतचा मृत्यू

दरम्यान, पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे या महिन्याच्या सुरुवातीला अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, दोन आरोपींनी पालायन केल्याचा बनाव रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक युवराज कामटेसह 5 पोलिसांना अटक करण्यात आली. तसेच या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.

याप्रकरणात 12 आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.