Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर २७, २०१७

विधानपरिषद पोटनिवडणूक; प्रसाद लाड यांना भाजपकडून उमेदवारी

मुंबई :शिवसेनेचा कडवा विरोध, हिवाळी अधिवेशन आणि गुजरात निवडणुक रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा विधानपरिषेदतला पत्ता कट झाला असून,त्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आयात झालेल्या प्रसाद लाड यांना विधानपरिषदेच्या तिकीटाची लॉटरी लागली आहे.विधानपरिषद पोटनिवडणुसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी मिळाली असून  ते आता भाजपच्या वतीने विधान परिषदेची निवडणूक  लढवणार आहेत.

नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी येत्या ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे विधानपरिषदेचं तिकीट  नारायण राणे यांनाच मिळणार असल्याचे बोलले जात होते.  मात्र भाजपने नारायण राणे यांना डावलून  प्रसाद लाड यांना पसंती दिली आहे. विशेष म्हणजे या पोट निवडणुकीसाठी काही काळ माधव भंडारी यांचं देखील नाव चर्चेत होत. तर काँग्रेसकडून सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.येत्या 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या  या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.