तेलवासा कोळसा खाणीत अपघात
व्यावस्थापणेच्या दुर्लक्षामुळे अपघात झाल्याचा कामगाराचा आरोप
शिरीष उगे
*वरोरा/भद्रावती:* भद्रावती तालुक्यातील वेकोलिच्या माजरी क्षेत्रातील तेलवासा कोळसा खाणीत झालेल्या ह्या अपघात डोजर ऑपरेटर चा मृत्यू झाला. निरसु झा (५४ ) या मृतक कामगारांचे नाव असून तो वेकोलीच्या एकता नगर वसाहतीत राहत होता.
सदर घटना दि. २४ ला रात्रौ ११:१५ वाजता घडली . याच खाणीत एका कामगाराला गंभीर दुखापत झाली होती. विशेष म्हणजे या खानीला अनेकदा सुरक्षा संबंधी पुरस्कार मिळालेले असून आठ दिवसापूर्वीच पेंच येथील सुरक्षा पथकाचे सदर खणीचे प्रशिक्षण केले होते. कामगारांनी या खाणी संबंधी व्यवस्थापकाला कोणाची सुरक्षा दिली होती आज व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप कामगारांना होत आहे. कोळसा काढल्यानंतर निघालेल्या कोळशाचे समानतिकरन डोजर च्या साहाय्याने मृतक निरसु झा हे करीत होते त्याचवेळेस भूसळलन झाल्यामुळे संपूर्ण ओबी त्यांच्यावर कोसडली त्यात ते दाबून गेले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मातीच्या ढिगाऱ्यातून त्यांचे प्रेत काढण्यास सकाळचे सहा वाजले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शनिवार, नोव्हेंबर २५, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
३०पैकी दोनच वाळू ट्रक्टरवर कारवाईघुग्घुस
मिनी मॅरेथान स्पर्धेत आदर्श विद्यार्थी युवक मंडळातील स्पर्धकांना यशचंद्रपूर- शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी चंद्रपू
घातपात घडु नये या करीता चंद्रपुर पोलिसांची माॅक ड्रिलचंद्रपूर/प्रतिनिधी:चंद्रपुर जिल्हयातील काही भाग ह
एसटी बसमधून चंद्रपूरला दारू बुटीबोरी - दारूबंदी असलेल्या वर्धा आणि चंद
वणी वरोरा मार्गावर भीषण अपघात 1 ठार,1गंभीर जखमीवरोरा/भद्रावती (शिरीष उगे):वरोरा वणी मार्गावर झाल
भावी पिढी सक्षम करण्यासाठी ग्राम नियमित स्वच्छ राखा - जितेंद्र पापळकरचंद्रपु
- Blog Comments
- Facebook Comments