Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर १९, २०१७

चहाचा घोटच ठरला अखेरचा

तीन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

सोलापूर : चहाची तलफ लागल्याने चहा पिण्यासाठी बाइकवरून जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा रस्ते अपघतात मृत्यू झाला. भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे हे तिन्ही विद्यार्थी ठार झाले. आज पहाटे ही दुर्देवी घटना घडली.संगमेश माळगे, दीपक घुमडेल आणि अक्षय आसबे अशी या तिन्ही विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिघेही सोलापूरजवळील तळे हिप्परगाजवळ आर्किड महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षण घेत होते. ते तिघेही शनिवारी रात्री ग्रंथालयात अभ्यासासाठी गेले होते. पहाटे तीनच्या सुमारास चहा पिण्यासाठी ते तळे हिप्परगा येतील कँटीनवर आले होते. यादरम्यान रस्त्यावरून जाणार्‍या ट्रकने तिघांना उडविले. यात तिघेही गंभीर जखमी झाले. पोलीस तसेच ग्रामस्थांनी या तिघांना जखमी अवस्थेत सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले, परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.अपघातात ठार झालेला दीपक हा सोलापूरच्या रेमंड शोरुमच्या मालकाचा मुलगा आहे. तर अक्षय आसबे हा पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील रहिवाशी आहे. अपघाताचे वृत्त समजताच रुग्णालयात नातेवाईक तसेच त्याच्या मित्रांनी गर्दी केली होती. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही रुग्णालयात भेट देवून पाहणी केली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.