Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर ०३, २०१७

चंद्रपूरच्या प्राचार्याचा नागपुरात खून

नागपूर/प्रतिनिधी :ललित लांजेवार

नागपुरात नीरी गेट जवळ चंद्रपूरच्या एका प्राचार्याचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. मोरेश्वर वानखडे (वर्ष 55) असे या प्राचार्यांचे नाव असून ते चंद्रपूर येथील एका प्रख्यात खत्री कला वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य असल्याचे सांगण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे,मोरेश्वर वानखडे यांची आज सकाळी ८ च्या सुमारास उघड़किस आली. नागपूर चंद्रपूर मार्गावरील नागपूर शहरात असलेल्या निरी पर्यावरण संशोधन संस्थेसमोर अध्न्यात व्यक्तींकडून तलवारीने भोसकून हत्या करण्यात आली ,नागपुरात गेल्या 3 दिवसातील तिसरी खुनाची घटना आहे, या घटनेविषयी सध्या प्राथमिक माहिती मिळाली असून अध्न्यात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बजाजनगर पोलीस (नागपूर) अंतर्गत सुरु आहे.



चंद्रपूरच्या तुकूम भागातील कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत होते. त्यांच्या हत्येमागील नेमके कारण स्पष्ट नसले तरीही वैयक्तिक भांडणातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूरमधील नामांकीत महाविद्यालयाचे प्राचार्य वानखेडे यांच्या हत्येने नागपूर आणि चंद्रपूर येथे खळबळ उडाली आहे. उपराजधानीत नरेंद्र नगर भागातील रहिवासी डॉ. वानखेडे गेली ९ वर्षे गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न मोठ्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम बघत होते. रोज सकाळी आपल्या दुचाकीने रेल्वे स्टेशनवर जात असत. स्टेशनवर दुचाकी वाहन पार्क करून ते रेल्वे गाडीने चंद्रपूरला जात. रोजप्रमाणे आजही सकाळी ते आपल्या घरातून निघाले. पण, कॉलेजला मात्र पोहोचलेच नाहीत. त्यांच्या पत्नी अनिता वानखेडे देखील पेशाने शिक्षिका आहेत.

पहाटे ४.१५ च्या सुमारास नागपूर पोलिसांना शहरातील गजबजलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. या मार्गावरील निरी संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराहून काही अंतरावर हा मृतदेह पडला होता. जवळच पडलेल्या मोबाईल फोनमुळे हा मृतदेह प्राचार्य वानखेडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.