Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर ०२, २०१७

काळी जादूने लुटले सव्वातीन लाख



नागपूर - काळी जादूने कुटुंबावर मोठे संकट आहे. वडील व बहिणीचा कोणत्याही क्षणी मृत्यू होईल, अशी भीती दाखवून पीडित महिलेला सव्वातीन लाख रुपयांनी गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी २ पंडितांसह ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
पीडित महिला उच्चशिक्षित असून ती अविवाहित आहे.  ती श्वानप्रेमी असल्याने त्याच्या मृत्यूनंतर तिने बंगल्यातील मोकळ्या जागेत पुरून तेथे ‘स्मृतिस्थळ’ तयार केले. दरम्यान, तिच्या नातेवाईकांनी बंगला विकायची तयारी चालविली होती. बंगला विकत घेणारा बिल्डर हा बंगल्यातील स्मृतिस्थळ हटविणार असल्याचे पीडित महिला तणावात होती.

एका ड्रायव्हर राजेशने महिलेसोबत सलगी साधून ‘तुमच्या वडिलांवर व बहिणीवर काळी जादू झाली असे सांगितले. त्यांचा मृत्यू होणार असल्याने पूजा करावी लागेल, अशी त्याने थापही मारली.
चंद्रपूर येथील कालीमाता मंदिरात भोजनदान केल्याने संकट टळू शकते, असे सांगत आरोपीने महिलेकडून वेळोवेळी पैसे घेतले. काशीनाथ पंडित व विशाल पंडितकडून पूजा करायची आहे, असे सांगून महिलेकडून त्याने १ लाख रुपये घेतले. तसेच संकट टाळण्यासाठी अचरज टॉवर ये‌थील तुलसी फार्मसीमधून सव्वा लाख रुपयांची जडीबुटीही विकत घ्यायला लावली. यावेळी दोन्ही आरोपी पंडित राजेशसोबत होते.
याचदरम्यान काशीनाथ पंडितने पीडित महिलेला बांगडी दिली. ‌जडीबुटी ठेवून बांगडीची पूजा करा, असे विशाल पंडितने सांगितल्याने महिलेने घरी पूजा करायला सुरुवात केली. त्यानंतर आरोपी विशालने महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधत, ‘रुमालात बांगडी व घरातील दागिने ठेऊन माझ्याकडे आणून द्या’, असे सांगितले.
यामुळे महिलेला संशय आल्याने तिने दागिने देण्यास नकार दिला. तिने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगून पोलिसांत धाव घेतली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ५ जणाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.