रामटेक प्रतिनिधी-
रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील भिलेवाडा या गावाजवळ भिलेवाडा कडून रामटेक कडे येत असतांना विरूदध दिशेने येणाऱ्या सायकलस्वारांस हार्वेस्टर मशीच्या मागील चाकाची धडक लागल्याने सायकलस्वार जखमी झाला.धडक लागल्यावर हा हार्वेस्टर घटना स्थळावरून पसार झाला मात्र रामटेक प[ओलीसांनी त्याचा पाठलाग करून हार्वेस्टर मशीन रामटेक येथे बसस्टॅंडजवळ ताब्यात घेतले.
दिनांक 26/11/2017 चे दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत सविस्तर वृत्त असे की टी.एस 16,ईएन-0743 या क्रमांकाचे हॉर्वेस्टर रामटेककडे येत असताना भिलेवाडा येथील रहिवासी दादाराव डोंगरे सायकलने भिलेवाडाकडे जात असतांना भिलेवाडयाजवळ मागील बाजुच्या चाकाची धडक सायकलला लागल्याने दादाराव डोंगरे यांना गंभीर दुखापत झाली.सदर घटना झााल्यानंतर हॉर्वेस्टर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला.रामटेक पोलीस स्टेशन येथील पो उपनिरीक्षक मनोहर जंगवाड यांना माहीती मीळताच त्यांनी पाठलाग करून रामटेकच्या बसस्टॅंड चौकात हे हॉर्वेस्टर पोलीसांनी ताब्यात घेतले.