Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर २६, २०१७

दुचाकीच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यु

चिमूर /प्रतिनिधी :
accident साठी इमेज परिणाम            चिमुर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पिपर्डा येथील शेतकरी दहा वाजताच्या सुमारास शेताकडे जात असतांना भरधाव दुचाकीने सायकलस्वारास जोरदार धडक दिली यात सायकल स्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारच्या रात्री  पळसगाव - पिपर्डा मार्गावर घडली. गणपत दोडकु शेंद्रे (६०) असे मृतकाचे नाव आहे

दुचाकीस्वार महेश वासुदेव पुसाव (२३) पिपर्डा हे कामानिमीत्य पळसगाव येथे आले होते. काम आटोपुन शुक्रवारला रात्री दहा वाजता MH 34 AZ 6384 या दुचाकीने पिपर्डा येथे जात होते. दुचाकीचा लाइट कमजोर व गळद रात्र असल्याने रस्ता बरोबर दिसत नव्हता. त्यामुळे सायकल व दुचाकीची जोरदार धडक झाली. ज्यात गणपत शेंद्रे याचा जागीच मृत्यु झाला.
या घटने दुचाकीचालकाच्या डोक्याला जबर मार लागला असून यास उपजिल्हा रुग्णालय चिमुर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे  मृतक यांचे  शव विच्छेदन करन्यात आले. असून  पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.