Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर १३, २०१७

म.रा.वि.म.च्या विभागीय लेखापालास कारावासाची शिक्षा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
आरोपीने तक्रारदारानचे विद्युत बिल वाटपबाबत मंजुर 50,000/-रू रक्कमेचा कंत्राट आदेशाची प्रत देणेकरीता 1900/-रू लाचेची मागणी करण्याप्रकरणी म.रा.वि.म.च्या विभागीय लेखपालास दोषी करारदेत रामा भावसिंग चव्हाण या विभागीय लेखापालास सत्र न्यायालयाने आज कारावासाची शिक्षा सुनावली आहे

 त्यांचे विरूध्द दि. 30/09/2002 रोजी पोेस्टे. बल्लारशहा जि. चंद्रपूर येथे अप क्र. 3100/02 कलम 7, 13, (1) (ड), सह कलम 13 (2) ला.प्र.का. 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता . या गुन्ह्याचा तपास पी.आर. चौधरी, तत्कालीन पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि चंद्रपूर यांनी पुर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.तब्बल पंधरा वर्षानंतर माननीय न्यायालयाने या आरोपीला कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

   मा. श्री. नि.रा. नाईकवाडे, जिल्हा न्यायाधिश क्र. 3 व अतिरिक्त सत्र न्यायाधिश चंद्रपूर यांचे न्यायालयात सदर खटला चालविण्यात आला. आज दि. 13/11/2017 रोजी मा. न्यायालयाने आरोपी रामा भावसिंग चव्हाण, विभागीय लेखापाल, विभागीय कार्यालय म.रा.वि.म. बल्लारशहा जि.चंद्रपूर  यांना 7 ला.प्र.का मध्ये 2 वर्षे सश्रम कारावास व 5000/- रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा व 13 (2) ला.प्र.का. अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास व 8000/- रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास श्री. सरकारी पक्षाचे वतीने तत्कालीन अॅड. आसीफ शेख यांनी काम पाहिले व त्यांना श्री डि.एम. घुुगे, पोलीस उपअधीक्षक श्री सचिन म्हेत्रे, पोलीस निरीक्षक, नापोशि. अरूण हटवार ला.प्र.वि. चंद्रपूर यांनी सहाय्य केले.

श्री पी. आर. पाटील पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो नागपूर परिक्षेत्र तर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी/कर्मचारी किंवा यांचे वतीने कोणी खाजगी ईसम लाचेची मागणी करीत असल्यास कृपया अॅन्टी करप्शन ब्युरो, कार्यालयाशी संपर्क साधावा.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.