Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर १३, २०१७

चिमूर तालुक्यातील मदनापुरच्या ग्रामसेवकाला लाच घेतांना रंगेहात अटक

चंद्रपूर/ प्रतिनिधी:
घरगुती जागेच्या हिस्से वाटणे प्रकरणी फेरफार करण्याचा प्रकरणावरून चिमूर तालुक्यातील गटग्रामपंचायत मदनापूर येथील ग्रामसेवक विनोद झिले यांना 1800 रुपयांची लाच स्वीकारताना  चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विभागाकडून सोमवारी रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार हे चिमूर तालुक्यातील मौजा चैतीतुकूम येथील रहिवासी असून त्यांचे तिथे किराणा दुकान आहे. तक्रारदाराचे वडील 2012 मध्ये मरण पावल्याने खुली जागा व घर आईच्या नावाने झाल्याने आईने तक्रारदार व तीन मुलांना स्थावर मालमत्तेचे शंभर रुपयांपासून वाटणी पत्र तयार करून दिले

यात तक्रारदाराच्या हिस्याला आलेल्या आपसी वाटणी पत्राप्रमाणे फेरफार होणेकरीता गटग्रामपंचायत मदनापुर तालुका चिमूर येथे सप्टेंबर 2017 मध्ये अर्ज व फेरफार संबंधित संपूर्ण कागदपत्रे दाखल केली त्यानंतर त्यांची  भेट घेऊन फेरफार करून देण्याची विनंती केली. मात्र तक्रारदार यांना ग्रामसेवक विनोद झिले यांनी मी फुकट काम करीत नाही या कामाकरिता मला 2000 रुपये द्यावे लागतील असे सांगून लाचेची मागणी केली

मात्र तकररदाराला हि लाच द्यायची नसल्याने त्यांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली .या तक्रारीची दखल चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेत सापडा रचत तक्रारदारास 1800 रुपयांची तडजोड करून याचे ठरविले.

ही रक्कम मौजा चैती तुकूम येथे स्वीकारण्याची तयारी आरोपी ग्रामसेवकाने दर्शविली. मात्र या ग्रामसेवकाला आपण लाच घेत आहोत जर आपण या प्रकरणात सापडलो तर आपले काय होईल याचा जरासाही अंदाज नसल्याने तिथे दडी मारून बसले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी यांनी त्याला 1800 रुपये लाच घेताना रंगेहात अटक केली.

 सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूर, श्री. पी. आर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूरच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक डी.एम घुगे ला.प्र.वि. चंद्रपूर तसेच कार्यालयीन कर्मचारी मनोहर एक एकोणकर, मनोज पिदुरकर, भास्कर चिचवलकर,अजय बागेसर यांनी यशस्वी रित्या पार पाडली





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.