Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर २०, २०१७

चिमोटे ठरला उपसरपंच पदाचा किंगमेकर

पारशिवणी : - तालुक्यातील ग्राम पंचायत टेकाडी कोयला खदान ही १७ सदस्य व सरपंच जनतेतून झाल्या नंतर १८ ची बॉडी असलेली मोठी ग्राम पंचायत आहे.नवनियुक्त सरपंच सुनीता मेश्राम सह ७ सदस्य जिंकत भाजपने टेकाडी ग्राम पंचायतींवर आपला कमळ फुलविला आहे.परंतु उपसरपंच पदावरही भाजपचाच उमेदवार बसावा म्हणून चुरशीची लढाईत जोडी तोडी चे राजकारण भाजप कडुन सुरू असताना दिनेश चिमोटे या अपक्ष उमेदवाराचे मत निर्णायक ठरले ज्यात १७ सदस्यांच्या मतात भाजपच्या मीनाक्षी सुरेंद्र बुधे यांनि भजपच्याच संध्या अजय सिंह यांच्या विरोधात ९ मते घेऊन संध्या सिंह यांना पराभूत केले व मीनाक्षी बुधे नि आपला विजयाचा शिक्का उपसरपंच पदी मोर्तब केला.ज्यामुळे निवडणूक प्रक्रिये दरम्यान टेकाडी विरुद्ध वेकोली असे समिकरन दिसून पडले.

निवडणूक अधिकारी म्हणून नवनियुक्त सरपंच सुनीता मेश्राम व ग्राम विकास अधिकारी भरत मेश्राम यांनी बाजू सांभाडली उपसरपंच पदासाठी काँग्रेस कडून आशा राऊत तर ग्राम विकास पॅनल कडून ऋषी नागरकर भाजप कडून संध्या सिंह व मीनाक्षी बुधे यांनी आपली नामांकने सादर केली ज्यात २ वाजता गुप्त मतदान निवडणूक प्रक्रियेत पद्धतीने निवडणूकिला सुरवात झाली भाजपच्या मीनाक्षी बुधे यांच्या कडे हक्काची ७ मते तर तडजोडीच्या राजकारणा मध्ये २ मते अपक्ष उमेदवारची ओढून आणण्यात भाजपला यश आल्याने भाजपची बळ संख्या ९ वर जाऊन पोचलेली होती अश्यात भाजप कडून संध्या सिंह यांनी आपल्या नावाची वर्णी काँग्रेस व ग्राम विकास पॅनल कडून लावल्याने भाजप च्या मीनाक्षी बुधे यांची बळ संख्या ९ वरून ८ वर आली तर संध्या सिंह यांची सदस्य बळ संख्या काँग्रेस व ग्राम विकास पॅनल यांच्या संगमताने ८ वर जाऊन पोचली अश्यात टेकाडी येथील अपक्ष उमेदवार दिनेश चिमोटे यांनी अडीच वर्षे उपसरपंच पदाची अट सुरवातीला ठेवलेली होती.परंतु राजकीय डाव पेच बघता कुठल्याही आर्थिक व पदाच्या प्रलोभनात न पडता शेवटी चिमोटे यांनी उपसरपंच पदाचे नामांकन भरले नाही व गावाच्या एकीकरणासाठी मीनाक्षी बुधे यांना आपले मत दिल्याने भाजपच्या पदरात ९ मते पडली ज्यामुळे उपसरपंचाचे पद भाजप च्या पदरात आले व टेकाडी ( को. ख.) ग्राम पंचायतींवर बहुमताने भाजपला सत्ता काबीज करण्यात यश आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.